Cotton Production Guidance
Cotton Production Guidance Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापसाची उत्पादकता वाढवा

Team Agrowon

Beed News : आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापसाची उत्पादकता वाढविण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्र खामगाचे (ता. गेवराई) विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) डॉ. हनुमान गरुड यांनी दिला.

कापूस लागवड व पाणी व्यवस्थापन विषयांवर ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रम ईश्‍वरी ॲग्रो ट्रेंड्‍स लोणाळा फाटा येथे गुरुवारी (ता. २५) कृषितज्ज्ञ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या वेळी डॉ. गरुड मार्गदर्शन करीत होते.

‘सकाळ-ॲग्रोवन’ आयोजित या कार्यक्रमाला रिवुलिस इरिगेशन प्रा.लि.ने प्रायोजित केले होते. डॉ. गरुड यांनी कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

आपल्या मार्गदर्शनात कापूस पीक संदर्भात जमिनीची निवड, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा वापर, लागवडीची योग्य वेळ, जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड, कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी उपयुक्त अंतर, पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया, कापूस पिकातील आंतरपीक पद्धत, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचनाद्वारे खत तसेच पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत आणि तण व्यवस्थापन त्याच प्रमाणे कापूस सघन लागवड तंत्रज्ञानाचा यामध्ये उपयुक्त वाण तसेच वाढरोधकाची फवारणी, शेंडा खुडणे या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन शंकासमाधान केले. रिवुलिस ठिबक सिंचन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, यामुळे उत्पन्नवाढीस निश्‍चित फायदा होत, असल्याचे प्रतिपादन रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव यांनी केले.

१९६५ दशकापासून सुरू असलेल्या या संस्थेने शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाचा वापर करत योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन शेतीसाठी कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले. रिवुलिस ठिबक सिंचन शासनाच्या विविध योजनेस पात्र आहे.

शेतकऱ्यांनी रिवुलिस कंपनीचे ठिबक सिंचन का वापरावे व त्याचा फायदा काय या विषयी शेतकऱ्यांना श्री. जाधव यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ ॲग्रोवन आयोजित व रिवुलिस इरिगेशन प्रायोजित चर्चासत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. असे चर्चासत्र आयोजित केल्याने शेतीचे नियोजन कसे करावे याची शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती होते असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी कु. आश्‍विनी मस्के यांनी केले.

या वेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतनकुमार सोनवणे, आभार अभय कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला उत्तर मध्य महाराष्ट्र रिवुलिस इरिगेशन, विजय घुगे, कृषी सहायक प्रकाश वाघमारे, एस. एस. पवार, सुतार, विष्णुपंत आबुज, रिवुलिस जिल्हा प्रतिनिधी विशाल कुलकर्णी, सतीश बुरांगे, भागवत खैत्रे, ऋषिकेश पवार, उबाळे, नारायण मोरे, तुकाराम मुळक आदी उपस्थिती होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

SCROLL FOR NEXT