Canal Water Agrowon
ॲग्रो विशेष

Tembu Water Scheme : सांगोल्यातील वंचित गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश

MLA Shahajibapu Patil News : सांगोला तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या डोंगरगाव, मानेगाव, हणमंतगाव या गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.

Team Agrowon

Sangola News : सांगोला तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या डोंगरगाव, मानेगाव, हणमंतगाव या गावांचा टेंभू योजनेमध्ये (Tembu Water Scheme) समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.

सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या हटकर मंगेवाडी गावातून टेंभू योजनेचा कॅनॉल जातो. गेल्या महिन्यांमध्ये आमदार आपल्या दारी अभियानासाठी आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील हटकर मंगेवाडी गावात गेले असता.

मुख्य कॅनॉल जात असून शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे तेथील नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

मुख्य कॅनॉल हा उतारावरून गेला आहे आणि लाभ क्षेत्रातील शेती चढावर असल्याने योजनेचा कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आले.

यावर आमदार पाटील यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन जत तालुक्यातील नवाळवाडी गावातून हटकर मंगेवाडी गावातील शेतीला पाणी मिळण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार आता कामाला सुरवात होणार आहे. हटकर मंगेवाडी गावचा उर्वरित भाग गुनापवाडी, जुजारपूर, डोंगरगाव, मानेगाव, हणमंतगावच्या उर्वरित भागाला पाणी मिळणार आहे.

या गावातील वंचित भागाला आता पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT