Agricultural Sanjeevani Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Krushi Sanjeevani Project : कृषी संजीवनी प्रकल्पात नाशिकमधील ५३२ गावांचा समावेश

Agriculture Project : मंत्रिमंडळाच्या १० ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठीच्या गाव निवड समितीने राज्यातील ६९५९ गावांचा समावेश केला आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक : मंत्रिमंडळाच्या १० ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठीच्या गाव निवड समितीने राज्यातील ६९५९ गावांचा समावेश केला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ५३२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची सुधारणा करणे, सुपीकता वाढविणे, शेततळे करणे, बागांची उभारणी करणे, शेडनेट व पॉली हाऊस बांधणे, सिंचनाच्या सोयी करणे, यांत्रिकीकरण करणे, शेती मशागतीची औजारे याचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

मागील वर्षात फक्त मालेगाव तालुक्‍यातील गावांचाच या योजनेत समावेश झाला होता. मात्र, जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात ही योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा हवामान बदलास अतिसंवेदनशिल जिल्हा असून दरवर्षी नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान होत असते. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्याबाबत आजी माजी लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे सातत्याने मागणी केली होती.

अखेर मागणीला यश आले असून जिल्ह्यातील गावांना यात सहभागी करून घेण्यात आले आहे. प्रकल्पाच्या टप्पा-१ मध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील सर्व गावांना प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शेतीविषयक नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी उपयोग करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी उपाययोजना करणे त्यायोगे शेतीमधील कर्ब उत्सर्जन कमी करणे शेतीमध्ये कर्बग्रहण वाढवून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य होणार आहे. संवर्धित व पुनर्जीवित हवामान शेती पद्धतीचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढवली जाणार आहे.

पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे, हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विशेष संशोधन यामध्ये भागीदारी करणे इत्यादी घटकांचा या प्रकल्पामध्ये समावेश असणार आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासह जमिनीचा पोत सुधारणे यावर प्रामुख्याने भर दिला जाणार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SARATHI Scheme: शेतकरी मुलांना ‘सारथी’ची साथ: मुख्यमंत्री फडणवीस

Data Centre Commitee: ‘डेटा सेंटर’चा मानवी जीवनावरील परिणामाच्या अभ्यासासाठी समिती: उद्योग मंत्री उदय सामंत

Illegal Sand Mining: वाळूमाफियांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करू : महसूलमंत्री बावनकुळे

Sugar Industry Asset Seizure: आणखी तीन कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

India US Trade Deal: भारत-अमेरिका कराराला शेतकरी संघटनांचा विरोध; चंडीगड येथे संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक

SCROLL FOR NEXT