Wine  Agrowon
ॲग्रो विशेष

Wine Industry : वाइन उद्योगासाठीची प्रोत्साहन योजना पुन्हा राबविणार

Scheme For Wine Industry : वाइन उद्योगासंबंधीची बंद पडलेली प्रोत्साहन योजना राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी पाच वर्षांसाठी पुन्हा राबविण्याचा निर्णय गुरुवार (ता. ४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुकूंद पिंगळे

Nashik News : वाइन उद्योगासंबंधीची बंद पडलेली प्रोत्साहन योजना राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी पाच वर्षांसाठी पुन्हा राबविण्याचा निर्णय गुरुवार (ता. ४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वाइन उद्योगातील सर्व संलग्न घटकांना त्याचा फायदा होऊन ‘ग्रेप टू ग्लास’ मूल्यसाखळी सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे.

पूर्वी वाइन विक्रीवर विक्री कर आकाराला जायचा; मात्र पुढे बदल होऊन मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू झाल्यानंतर २० टक्के आकारणी होऊ लागली. ही आकारणी वाइन उद्योगासाठी अडचणीची असल्याने पूर्वीप्रमाणेच विक्री कर आकारावा, अशी वाइन उद्योगाची मागणी होती. त्यावर तत्कालीन राज्य सरकारने निर्णय घेतला होता.

मूल्यवर्धित कर रद्द करणे अडचणीचे असल्याने त्यास पर्याय म्हणून २० टक्के भरणा केल्यानंतर पुन्हा उद्योग विभागाच्या वतीने १६ टक्के परतावा दिला जात होता. मात्र एप्रिल २०२० मध्ये कोरोना काळात ही योजना पुन्हा बंद पडली होती. ती पुन्हा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.

राज्यात वाईनसाठी विक्रीकर रद्द केल्यानंतर मूल्यवर्धित कर आकारणी सुरू झाल्यानंतर पर्याय म्हणून राज्य सरकारने आकारलेल्या २० टक्के करातून पुन्हा १६ टक्के परतावा देण्याचे लागू केले होते. ही योजना १ ऑगस्ट २००९ पासून अस्तित्वात होती. मात्र कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकारने परतावा स्वरूपातील अनुदान योजना बंद केल्या.

यानुसार एक १ एप्रिल २०२० पासून हा लाभ उद्योगातील घटकांना मिळत नव्हता. पूर्वीप्रमाणेच लाभ मिळावा, अशी मागणी वाइन उद्योगाची पुन्हा मागणी होती. त्यानुसार राज्य सरकारने स्थगिती उठविल्याची माहिती अखिल भारतीय वाइन उत्पादक संघाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिली.

...असे आहे सरकारचे धोरण

या परतावा योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक आहे. योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या १६ टक्केप्रमाणे व्हॅटचा परतावा देखील देण्यात येईल.

द्राक्ष उत्पादकांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाइन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्यात वाइन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल. त्यामुळे या योजनेस ५ वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्योगाकडून निर्णयाचे स्‍वागत

निर्णयामुळे राज्‍यातील द्राक्ष उत्‍पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. याशिवाय फळांचे नुकसान टाळण्यास मदत होईल. त्यामुळे उद्योगाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. पुढील काळात त्याचा उद्योगाला लाभ होणार असल्याचे जगदीश होळकर यांनी सांगितले.

या निर्णयामुळे उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. वाइन द्राक्ष उत्पादकांना वेळेवर कच्च्या मालाची देयके अदा करताना परतावा स्वरूपात रक्कमेचा हातभार लागणार आहे.
- सदाशिव नाठे, संचालक, विनसुरा वायनरी, विंचूर, ता. निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

krushi kumbh: नाशिकच्या ‘कृषिकुंभ’मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जागर

Health Scheme: मोफत उपचार असताना रुग्णालयांनी पैसे उकळले, ३३८ प्रकरणी कारवाई, आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

IAS Varsha Meena: उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी मीना

Carbon Sequestration: कर्ब साठवणूक : कार्बन अर्थव्यवस्थेची संधी

LPG Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’

SCROLL FOR NEXT