Livestock Vaccination Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Vaccination : पुढील तीन महिने पशुपालकांची चिंता वाढणार; प्रतिबंधात्मक लसीकरणचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

जून महिन्यात बीड आणि पुणे जिल्ह्यात घटसर्प, शेळ्यां-मेंढयांच्या देवी रोगाचा इशारा देण्यात आला आहे.

Dhananjay Sanap

राज्यातील पशुपालकांनी लम्पी रोग, लाळ खुरकुत, पीपीआर, घटसर्प आणि फऱ्या रोग प्रतिबंध्यात्मक लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पशूसंवर्धन आयुक्तक कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. पुढील तीन महीने जनावरांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पशु संवर्धन विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. वेळेत लसीकरण केले नाही तर जनावरांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. त्यामुळं पशुपालकाचं आर्थिक नुकसान होतं. त्यामुळं पशुपालकांनी लसीकरणला प्राधान्य द्यावं.

राज्यात गेल्या दोन दोन वर्षांपासून लम्पी रोगाचा मोठा फटका पशुपालकांना बसला होता. सध्या राज्यात लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून ५८.६३ लाख जनावरांना लसीकरण करण्यात आलं आहे. लम्पी रोग टाळण्यासाठी गोठ्यांची आणि जनावरांची काळजी घेणे गरजेचं आहे. गाय आणि म्हशीमध्ये लाळ खुरकुत आजार आढळतो. सध्या त्याचं लसीकरण सुरू आहे. राज्यातील ९३.२२ जनावरांना लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.

जून महिन्यात बीड आणि पुणे जिल्ह्यात घटसर्प, शेळ्यां-मेंढयांच्या देवी रोगाचा इशारा देण्यात आला आहे. तर जुलै महिन्यात अहमनगर, अकोला, अमरावती, नाशिक जिल्ह्यात घटसर्प, तसेच अहमदनगर जिल्ह्यात फऱ्या, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात पीपीआर रोगाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर ऑगस्ट महिन्यात अहमदनगर जिल्ह्याला लाळ खुरकुत, जळगाव घटसर्प, लातूरमध्ये फऱ्या तर अहमदनगर, धाराशीव, सांगली आणि वर्धा जिल्ह्यात पीपीआर रोगाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून या रोगांवर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे. तशा सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लसीकरण तत्काळ करून घेऊन आर्थिक नुकसान टाळावं, असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. लसीकरणबाबतची अधिकच्या माहितीसाठी पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT