Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : लातूर विभागात रब्बीच्या २८ टक्के पेरण्या

Rabi Sowing Update : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्यांनी आता चांगलाच वेग घेतला आहे.

Team Agrowon

Latur News : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्यांनी आता चांगलाच वेग घेतला आहे. पावसाने दिलेली उघडीप व सोयाबीनची काढणी पूर्ण झाल्यामुळे पेरण्यांचा टक्का २८ पर्यंत पोहचला आहे.

पेरणीत लातूर व धाराशिव जिल्हे मागे असून नांदेड, परभणी व नांदेड जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. या आठवड्यात आणखी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता असून आतापर्यंत पाच जिल्ह्यात १३ लाख ६३ हजार ९६० पैकी ३ तीन लाख ८७ हजार ४१५ हेक्टरवर (२८.४० टक्के) रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अपवाद सोडला तर उष्ण व कोरड्या हवामानामुळे रब्बी पेरण्यांना वेग आला आहे. कडक ऊन व वातावरणात उकाडा होता. दोन दिवसापासून थंडीची चाहूल लागली आहे. सध्या खरिपातील तुरीचे दाणे पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत असून सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी काढणी होताच सोयाबीनची बाजारात विक्री करण्यास सुरवात केली असून काही शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीनची मळणी न करता शेतातच ढीग लावून ठेवले आहेत. कापूस पिकाची पहिली वेचणी सुरू असून आतापर्यंत ३० टक्के कापसाची वेचणी झाली आहे. तुरीचे पीक फुलोऱ्यात असून काही भागात तुरीवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे.

खरीप ज्वारी व बाजरी दाणे पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. आतापर्यंत झालेल्या पेरण्यात परभणी जिल्हा आघाडीवर असून या जिल्ह्यात पाच टक्क्याच्या पुढे पेरण्या झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. आतापर्यंत रब्बी ज्वारीची सर्वसाधारण तीन लाख ७१ हजार ८५७ पैकी एक लाख १ हजार २४१ हेक्टरवर (२७.२३ टक्के) पेरणी झालेली आहे.

गव्हाची एक लाख ६५ हजार १९ पैकी १३ हजार ५६५ (८.६७ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची सात लाख ८६ हजार १२४ पैकी दोन लाख ५९ हजार ५१९ (३३.०१ टक्के) हेक्टरवर पेरणी झालेली आहे. करडईची १९ हजार ५३१ पैकी केवळ आठ हजार आठ (४१ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे.

लातूर विभागातील रब्बी पेरणीचा तपशील

जिल्हा सरासरी पेरणी क्षेत्र (हेक्टर) प्रत्यक्ष पेरणी

लातूर २,८०,४३९ ६५,१८२ २३.२४

धाराशिव ४,११,१७२ ८०,६९७ १९.६३

नांदेड २,२४,६३४ ७९,७०६ ३५.४८

परभणी २,७०,७९४ ९८,६६५ ३६.४४

हिंगोली १,७६,८९१ ६३,१६४ ३५.७१

एकूण १३,६३,९३० ३,८७,४१५ २८.४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Subsidy : महाडीबीटीच्या यंत्र वा अवजारांची खरेदी देयक ३० दिवसांनंतरही अपलोड करता येणार; कृषी विभागाने केली अट शिथिल

Kul Kayda: जाणून घेऊयात कूळ कायदा

Bihar Election Results 2025: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? 'जेडीयू'नं केलेली पोस्ट डिलीट केल्यानं चर्चेला उधाण

Maharashtra Politics: शतप्रतिशत भाजप

Animal Blood Transfusion: रक्त संक्रमण करतेवेळी जनावरांची काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT