Cotton Boll Worm
Cotton Boll Worm Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton : कापूस पट्ट्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू लागला

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः चार ते पाच वर्षांपूर्वी कपाशीवर जोरदार आलेल्या बोंड अळीचे (Cotton Boll Worm) संकट पुढील काळात कमी करण्यात यश आले. मात्र, यंदा पुन्हा ही बोंड अळी ठिकठिकाणी डोके वर काढू लागली आहे. यंत्रणांनी केलेल्या उपाययोजनांचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे. बोंडअळीला आतापर्यंत पोषक वातावरण मिळाल्याचा फटकाही कापूस उत्पादकांना बसू लागला आहे.

सलग पावसामुळे जिल्ह्यात सुमारे ९० हजार हेक्टरपर्यंत पिके बाधित झालेली आहेत. आता पिकांवर किडींचाही प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम दिसू लागला आहे. प्रामुख्याने कपाशीच्या उत्पादनात घटीची शक्यता वर्तवली जात आहे.

कपाशी पिकावर अकोट, बार्शीटाकळी, अकोला तालुक्यात काही ठिकाणी कृषी तज्ज्ञांनाही अवशेष मिळून आले आहेत. प्रामुख्याने जिनिंग प्रेसिंग असलेल्या शिवारात बोंडअळी आढळून आलेली आहे. प्रशासनाने या हंगामात एक जूननंतर कपाशी पेरणीचे आदेश काढले होते. शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी हे आदेश पाळत जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. आता पीक अडीच महिने कालावधीचे झाले आहे. कपाशीमध्ये अनेक ठिकाणी फूल, पात्या उगवल्या. फुलांमध्ये डोमकळ्या आढळत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यातील कपाशीवर हा प्रादुर्भाव अधिक आहे. ज्यांनी फरदड घेतली अशा शेतांमध्येही बोंडअळी आढळत आहे. या किडीसाठी पोषक असलेले वातावरण सध्या आहे. गेले काही दिवस पिकांना सूर्यप्रकाश मिळालेला नाही. सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने किडी फोफावत आहेत. कपाशीच्या पिकावर आता झालेला प्रादुर्भाव हा उत्पादन घटीसाठी प्रमुख कारणीभूत ठरू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT