Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी यंत्रणेकडून गावोगावी बैठका

Agriculture Department : आगामी खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला असून, त्या अनुषंगाने कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने गावोगावी खरीपपूर्व शेतकरी सभा घेतल्या जात आहेत.

Team Agrowon

Akola Agriculture Update : आगामी खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला असून, त्या अनुषंगाने कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने गावोगावी खरीपपूर्व शेतकरी सभा घेतल्या जात आहेत. हंगामाच्या अनुषंगाने जनजागृतीचे काम या बैठकांच्या माध्यमातून होत आहे.

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरच्या घरी सोयाबीन उगवण चाचणी कशी करावी याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येते. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जमीन आरोग्य पत्रिका, पीकविमा, अपघात विमा, बियाणे प्रक्रिया, एकात्मिक कीड-रोग नियंत्रण, खरीप पिकाची लागवड तंत्रज्ञान व उत्पादन वृद्धी, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, स्मार्ट योजना, पीएमएफई, रोजगार हमी योजना, पोकरा, फळबाग लागवड, नॅनो युरिया आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाण्यांची लागवड करण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण माहिती दिली जात आहे. प्रामुख्याने घरचे बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता तपासून घेण्याचा आग्रह केला जात आहे.

उगवण क्षमता किमान ७० टक्क्यांवर असेल तर अशा बियाण्यांचा वापर केला जावा. लागवडीपूर्वी बियाण्यास जैविक, रासायनिक बीजप्रक्रिया कशी करावी याचेही प्रात्यक्षिक या सभांमधून दिले जात आहे.

कृषी विभागाने गावोगावी बैठकांचे नियोजन केले आहे. कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ, तालुका कृषी अधिकारी, आत्माचे कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्रांचे तज्ज्ञ या ग्राम बैठकांना उपस्थित राहून खरीपपूर्व नियोजनाबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

मी सुद्धा काही तालुक्यांत स्वतः उपस्थित राहणार आहे. या बैठकांमध्ये बीज प्रक्रिया, शासकीय योजना, लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचेही काम होत आहे. -शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season: राज्यात रब्बीचे क्षेत्र दहा लाख हेक्टरने वाढणार: दत्तात्रय भरणे

Ativrushti Madat: शेतकऱ्यांना १८५८ कोटी ६७ लाख रुपयांची मदत वितरित

Banana Cultivation: खानदेशात केळी लागवड वाढण्याचे संकेत

Seed Bank: बियाणे बँक प्रत्येक गावात स्थापन करा; राहीबाई पोपेरे

Leopard Human Conflict: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी राज्यस्तरीय धोरण : अजित पवार

SCROLL FOR NEXT