Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : सिंधुदुर्गातील लघू प्रकल्पांत ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Team Agrowon

Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात झालेल्या वाढीचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले असून जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये ४४ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. पाइप, ओसरगाव या प्रकल्पांनी मार्चमध्येच तळ गाठल्यामुळे पाणीटंचाईचे संकेत मिळू लागले आहेत.

जिल्ह्यात एक मोठा, चार मध्यम आणि २३ लघू प्रकल्प आहेत. यातील २३ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. पावसाळ्यात यातील २० हून प्रकल्प १०० टक्के पूर्ण भरले होते. काही तांत्रिक दोषामुळे दोन-तीन प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे.

त्याचे दुष्परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. या प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घट होऊ लागला आहे. मार्चमध्ये जिल्ह्यातील काही लघू प्रकल्पांनी तळ गाठला आहे. या प्रकल्पांमध्ये केवळ ४४ टक्केच पाणीसाठा असल्यामुळे शेती संकटात सापडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात प्रचंड पाण्याची गरज शेतीला असते.

त्यामुळे उपलब्ध पाणी मे अखेरीपर्यंत पुरण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाइप, ओसरगाव या प्रकल्पांनी मार्चमध्ये तळ गाठल्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांची चिंता वाढली आहे. शिरगाव प्रकल्पात १९ टक्के, आडेली प्रकल्पात १६ टक्के, ओसरगावमध्ये १२ टक्के, पाइप टक्के, पाणीसाठा आहे.लघू प्रकल्पातील पाणी कमी झाल्यामुळे आजूबाजूच्या विहिरीच्या पाणीपातळीत देखील घट होत असल्याचे चित्र आहे.

प्रकल्प, पाणीसाठा टक्केवारीत

आडेली ः १६.३८ टक्के, आंबोली ः ३३.३९ टक्के, चोरगेवाडी ः५०.४१टक्के, हातेरी- ५०.१३ टक्के, माडखोल-५९.५९ टक्के, निळेली ः ४५.३३ टक्के, ओरस ब्रुदुक २८.३५ टक्के, सनमटेंब-७१.२१टक्के, तळेवाडी-५९.११ टक्के, दाभाचीवाडी-३०.३६ टक्के, पावशी-४८.२५टक्के, शिरवळ- ४४.९७ टक्के, पुळास-६४.९२ टक्के, वाफोली-२५.२४ टक्के, कारिवडे-४३.३९ टक्के, धामापूर-६७.२३ टक्के, हरकुळ-५५.६७ टक्के, ओसरगाव-१२.७७ टक्के, ओझरम-५४२६ टक्के, पाइप- टक्के, शिरगाव-१९.७९ टक्के, तिथवली-३६.४५ टक्के, लोरे-३८.७२ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT