Water Storage : निम्न दुधनात ८.२६ टक्के पाणीसाठा

Water Level Update : परभणी जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेला आहे.
Nimn Dudhna
Nimn Dudhna Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेला आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळी ६ वाजता या प्रकल्पात २०.००६ दलघमी म्हणजेच ८.२६ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला होता.गतवर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात धरणक्षेत्रातील अल्प पर्जन्यमानामुळे निम्न दुधना प्रकल्पाचे धरण भरले नाही.

Nimn Dudhna
Water Level : मध्यम, लघू प्रकल्पांतील पाणीसाठा बारा टक्क्यांवर

निम्म दुधना धरणाचा प्रकल्पीय जिवंत साठा २४२.२०० द. ल. घ. मी आहे. यंदाच्या १ जून रोजी या धरणामध्ये ७७.४३१ दलघमी (३१.९७ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात १ जून २०२३ पासून एकूण ५९१ मिलिमीटर पाऊस झाला. त्याआधीच्या वर्षी ७८५ मिलिमीटर पाऊस झाला होता. १ जून पासून एकूण २४.९०७ दलघमी पाण्याचा येवा झाला.

Nimn Dudhna
Water Level : शिराळा तालुक्यातील पाणीसाठ्यात घट, सात तलाव कोरडे

या धरणात बुधवारी (ता. २७) सकाळी ६ वाजता २०.००६ दलघमी म्हणजेच ८.२६ टक्के जिवंत पाणीसाठा होता. गतवर्षी (२०२३) ता. २७ मार्च रोजी या धरणात ११२.८११ दलघमी म्हणजेच ४६.५८ टक्के जिवंत पाणीसाठा होता.

बाष्पीभवन व इतर मिळून प्रतिदिन ६.७४ एमएमक्यूब व्यय होत आहे. तसेच बिगर सिंचन पाणी वापर ०.०३१० दलघमी आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे. येत्या काळात या धरणांवर अवलंबून असलेल्या गावात पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com