Department Of Revenue
Department Of Revenue Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Revenue Department : जळगाव जिल्ह्यात १४६ सजे, २४ महसूल मंडले वाढली

Team Agrowon

Jalgano News : शासनाच्या आदेशानुसार नवीन सजे, मंडलांची स्थापना करण्याचे कामे महसूल विभागातर्फे जळगाव जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्ह्यात पूर्वी ५०१ सजे होते. त्यात १४६ सजे वाढले आहेत. यामुळे आता ६४७ सजे झाली आहेत.

पूर्वी ८६ महसुली मंडले होती. त्यात २४ मंडलांची वाढ होऊन ती ११० झाली आहेत. सजे व मंडले वाढीमुळे महसूल विभागाला संबंधित परिसराच्या नागरिकांना दाखले देणे सोईचे होणार आहे. त्यानुसार महसूल वसुली होणार आहे.

नवीन वाढलेले सजे, मंडलात काम करण्यासाठी २०८ पदांची लवकरच भरती होणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

पूर्वीच्या सजे, मंडलांची रचना सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. तेव्हाचा परिसर, लोकसंख्येचा विचार करता त्यात पाच ते दहा पट वाढ झाली आहे. त्या परिसरातील एकाच तलाठी, मंडलाधिकाऱ्याकडे अनेक गावांचा कार्यभार होता.

जळगाव शहर व तालुक्याचा विचार केल्यास एकूण ८७ गावे आहेत. तालुक्यात पूर्वी ३२ सजे होती. आता ४६ झाली आहेत. पूर्वी सहा मंडले होती, ती आता आठ झाली आहेत.

जळगाव महानगर, मेहरूण, पिंप्राळा या ठिकाणी प्रत्येकी तीन गावांची, तर असोदा, नशिराबाद येथे प्रत्येकी दोन गावे नवीन निर्माण होतील. गावात कोणकोणता एरिया जोडायचा, त्यांना महसुली दर्जा कसा द्यायचा, याबाबत भूमिअभिलेखच्या उपअधीक्षकांकडे काम सुरू आहे.

सजाचे नाव कंसात चतुःसीमा

आव्हाणे (आव्हाणे), फुपनगरी (फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द), भोलाणे (भोलाणे), सुजदे (सुजदे, देऊळवाडे, नांद्रा खुर्द), कानळदा (कानळदा), जळगाव खुर्द (जळगाव खुर्द, खिर्डी, तिघ्रे), बेळी (बेळी, निमगाव बुद्रुक, भागपूर), चिंचोली (चिंचोली, पिंपळे), धानवड (धानवड, देव्हारी), म्हसावद (म्हसावद, वाकडी, कुऱ्हाडदे, लमांजन),

शिरसोली प्र. न. (शिरसोली प्र. न., दापोरे), शिरसोली प्र. बो. (शिरसोली प्र. बो.), विटनेर (विटनेर), पाथरी (पाथरी, वडली, डोमगाव, बोरनार), जवखेडे (जवखेडे, लोणवाडी खुर्द व बुद्रुक, सुभाषवाडी), वावडदे (वावडदे, बिलखेडे, बिलवाडी, रामदेववाडी),

जळके (जळके, वसंतवाडी, वराड बुद्रुक, खुर्द), भोकर (भोकर, भादली खुर्द), विदगाव (विदगाव, डिकसाई , रिधूर), किनोद (किनोद, कठोरा, फुपणी, देवगाव), आमोदे बुद्रुक (आमोदे बुद्रुक, जामोद, पळसोद, गाढोदा), धामणगाव (धामणगाव आवार, तुरखेडे, खापरखेडा), करंज (करंज, धानोरे खुर्द, सावेखडे खुर्द, आमोद खुर्द, घार्डी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather News : वैशाख वणव्याने होरपळ वाढली

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

SCROLL FOR NEXT