Palkhi Sohala 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Palkhi Sohala 2024 : इंदापुरात लाखो वैष्णवांनी अनुभवला रिंगण सोहळा

Aashdhi Wari 2024 : वैष्णवांच्या आगमनाने वातावरण भक्तिमय; यंदा एकच मुक्काम असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Team Agrowon

संतोष आटोळे
Indapur News : हातात झेंडे घेऊन धावणारे झेंडेकरी, तुळशी डोक्यावर घेऊन धावणाऱ्या महिला वारकरी, टाळ- मृदंगाचा गजर करीत धावणारे हजारो माउली, वीणा घेऊन धावणारे वैष्णव आणि शेवटी वायुवेगाने धावणारे अश्‍व असा अभूतपूर्व सोहळा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने इंदापूरमध्ये लाखो वैष्णवांनी अनुभवला.

अश्व धावे अश्वामागे! वैष्णव उभे रिंगणी!
टाळ मृदंगा संगे! गेले रिंगण रंगुनी!!

या उक्तीचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेतला. दरम्यान, इंदापूरला दरवर्षी पालखीचे दोन मुक्काम असतात मात्र यंदा तिथीचा क्षय झाल्याने एकच मुक्काम आहे. यामुळे शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती.

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता. १०) इंदापूर शहरात मुक्कामासाठी आगमन झाले. दरम्यान सकाळी रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. रांगोळी काढून फुलांचा सडा टाकत. इंदापूरकरांनी वैष्णवांचे स्वागत केले.

या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे, भाजप नेते व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, माजी नगराध्यक्षा अलका ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे महारुद्र पाटील, पोपट शिंदे, अनिकेत वाघ, कैलास कदम, अमोल भिसे, विठ्ठल ननवरे, माउली चवरे, पोपट पवार, ॲड. आशुतोष भोसले, प्रा. कृष्णा ताटे, इनायत काझी यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या रिंगण सोहळ्यात देव रिंगण, टाळकरी रिंगण, विणेकरी रिंगण झाले. माउलींच्या जयघोषात तुळशी वृंदावन डोक्यावर घेत वारकरी माउलींनी रिंगण भोवती फेरा लगावला. या सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या पालखी मुक्काम स्थळी विसावला.

या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पालखी मार्गावर इंदापूरकरांच्या वतीने विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे यांच्या वतीने वैष्णवांच्या सोयीसाठी चहापान अल्पोपहार यासारखे विविध उपक्रम राबवून वैष्णवांची सेवा करण्यात आली.

राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी जगद्‌गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथाचे सारस्थ करीत रथ रिंगण सोहळा स्थळी आणला.

त्यानंतर पाटील शेवाळे यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते मानाच्या अश्‍वाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उत्साहात रिंगण सोहळा झाला. तसेच अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांनीही घेतला रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT