Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : धुळ्यात माजी आमदार पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाया पडले

Water Issue : टंचाईमुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्याकडून निवेदने दिली जात आहेत.

Team Agrowon

Dhule Water News : टंचाईमुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्याकडून निवेदने दिली जात आहेत; परंतु दीड महिन्यापासून मागणीची दखल घेतली जात नसल्याने व यावर निर्णयासाठी प्रा. पाटील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पाया पडले.

पाटील यांनी सांगितले, की पांझरा नदीकाठची गावे आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्यावर दीड महिना उलटूनही जिल्हा प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे सरपंच, शेतकऱ्यांसह पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी पुन्हा गेलेल्या माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी ‘जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या पाया पडतो... पण पाणी सोडा,’ अशी विनंती करत जिल्हाधिकाऱ्यांच्या पाया पडले.

पांझरा नदीकाठच्या अनेक गावांना पाणीटंचाई भासत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांना पाण्याची गरज असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मेमध्ये अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. मात्र, या वर्षी मे महिना संपण्यात आला तरी धरणातून नदीपात्रात पाणी सोडलेले नाही.

त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्‍नी दोन दिवसांच्या आत धरणातून पाणी सोडण्याची सूचना द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार प्रा. पाटील यांनी दिला.

दरम्यान, जिल्ह्यात ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी धरणातून मागणीनुसार पाणी सोडले गेले. मात्र, ज्या ठिकाणी विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत अशा ठिकाणी दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VAMNICOM : वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेला ‘त्रिभुवन’ विद्यापीठाची मान्यता

Krishi Mandal Office : नसरापुरातील कृषी मंडल कार्यालय बेपत्ता

NCPSP Mandal Yatra : ‘राष्ट्रवादी’ची आता मंडल यात्रा

Maharashtra Agriculture Minister : महायुती सरकारचे खाते बदल; राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Banana Farming : इंदापूरच्या शेतकऱ्यांची केळी पिकाला पसंती

SCROLL FOR NEXT