Fertilizer
Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Buldana Fertilizer Supply : बुलडाणा जिल्ह्यात शाहू फाउंडेशन थेट बांधावर खतपुरवठा करणार

Team Agrowon

Buldana Fertilizer Market : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना थेट बांधावर खतपुरवठा (Fertilizer Supply) करण्याबाबत राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनने निर्णय घेतला आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. १७) जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

या वर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने आवश्यक कामे वेळेपूर्वीच उरकण्याकडे त्यांचा कल आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. खते, बियाणे भरून ठेवण्यासाठी तयारी केली जात आहे.

पेरणी तोंडावर आली, की बाजारात खते, बियाण्यांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने पुरेशी तयारी करून ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना थेट बांधावर खत, बियाणे उपलब्ध करण्याचा कृषी विभागाचा उपक्रम असेल तर राजर्षी शाहू सोशल फाउंडेशन सहकार्य करण्यासाठी तयार आहे.

शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागासोबत काम करण्याची तयारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शैलेशकुमार काकडे, दीपक महाराज सावळे, संजय लोखंडे, रवींद्र काकडे, तानाजी पैठणे, गणेश जाधव आदी उपस्थित होते.

गेल्या हंगामात केला होता १२० टन पुरवठा

राजर्षी शाहू सोशल फाउंडेशन सदैव शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करीत असते. अनेक शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन खत खरेदी करावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ जातो.

शिवाय जास्तीचे पैसे खर्च होतात. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनच्या वतीने मूळ किमतीत थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम राबवला जातो. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ होतो. मागील वर्षी १२० टन खताचा बांधावर पुरवठा करण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT