Rice  Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Sowing : आजऱ्यात दहा टक्के क्षेत्रावरच भाताची पेरणी

Rain Update : शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे पावसाच्या प्रतीक्षेत राहतात. तालुक्यात भाताच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ दहा टक्के क्षेत्रावर भात पिकाची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ढग येतात अन् जातात.. शेतकऱ्यांना कोकणाकडून येणाऱ्या ढगांमुळे पावसाची आस लागून राहते, पण काही वेळातच आकाश मोकळे होते. पुन्हा शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे पावसाच्या प्रतीक्षेत राहतात. तालुक्यात भाताच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ दहा टक्के क्षेत्रावर भात पिकाची पेरणी झाली आहे.

पावसामुळे पेरणी लांबली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. ज्या भागात पेरणी झाली आहे, तेथे पावसाअभावी ती वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट तयार झाले आहे.

यंदा मोसमी पावसाचे तालुक्यात आगमन झालेले नाही. जून महिन्यातील अखेरचे दिवस सुरू झाले तरी वरुण राजाची कृपा झालेली नाही. त्यामुळे खरिपावर काळजीचे ढग तयार झाले आहेत.

मे महिन्यात वळवाचा थोडा फार पाऊस झाल्यानंतर जून महिना आतापर्यंत कोरडाच गेलेला आहे. तालुक्याच्या पूर्व भाग व उत्तूर परिसरात भाताची पेरणी झालेली आहे; पण पश्चिम भागात भाताचे तरवे (रोपवाटिका) करण्यास अजून वेग आलेला नाही.

तालुक्यात भाताचे १०,८०० हेक्टर इतके क्षेत्र आहे. यापैकी केवळ ११०० हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. मॉन्सून लांबल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. पाऊस लांबला तर झालेली पेरणीही वाया जाणार असून, दुबार पेरणीचे संकट तयार होणार असल्याचे शेतकरी सांगतात.

सध्या भात पीक वगळता भुईमूग, सोयाबीन, नागली, अन्य पिकांची पेरणीही विशेष झालेली नाही. जेथे पाणी आहे, तेथे भाताचे तरवे शेतकऱ्यांनी टाकले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ashtamudi Lake: एका कवितेची सत्तरी

Citrus Crop Disease: लिंबूवर्गीय पिकांवरील ‘लीफ मायनर’

Soybean Market: सोयाबीन बाजाराची चाल कशी असेल?

Weekly Weather: तापमानात घसरण सुरू; थंडीची चाहूल

Agriculture Department :कृषी विभागाने बदलले बोधचिन्हासह घोषवाक्य

SCROLL FOR NEXT