Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : अहिल्यानगर बाजार समितीत गावरान कांद्याला ५६०० पर्यंत दर

Onion Rate : लाल कांद्यालाही पाच हजार रुपयांपर्यंत दर

Team Agrowon

Ahilyanagar Market Committee : अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानुदास कोतकर उपबाजार समिती, नेप्ती येथे झालेल्या कांदा लिलावात गुरुवारी (ता. ७) गावरान कांद्याला पाच हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी दर ४८०० रुपये होता.

अनेक दिवसांनंतर सध्या कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. गावरान कांद्याच्या दहा उच्च प्रतीच्या गोण्याला सात हजार रुपयांपर्यंत, १२ गोण्याला ६७०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला. गावरान कांद्यालाही पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गावरान कांद्याची आवक काहीशी कमी झाली आहे.

सध्या गावरान कांद्याची वीस हजार गोणींपर्यंत आवक होत असून लाल कांद्याची ७० ते ८० हजार गोणी आवक होत आहे. गुरुवारी (ता. ७) गावरान कांद्याच्या १६,५२० व लाल कांद्याच्या ८९,२४० गोण्यांची आवक झाली. गावरान कांद्याच्या उच्च प्रतीच्या दहा गोण्यांना सात हजार रुपये, १२ गोण्यांना ६७०० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला.

इतर कांद्यामध्ये एक नंबर प्रतीच्या कांद्याला ५८०० रुपये ते ६५०० रुपये, दोन नंबर प्रतीच्या कांद्याला ४८०० रुपये ते पाच हजार आठशे रुपये तीन नंबर प्रतीच्या कांद्याला ४ हजार ते ४ हजार ८०० रुपये व चार नंबर प्रतीच्या कांद्याला २२०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला. लाल कांद्यामध्ये एक नंबर कांद्याला चार हजार तीनशे ते पाच हजार रुपये, दोन नंबर प्रतीच्या कांद्याला तीन हजार तीनशे ते चार हजार तीनशे रुपये, तीन नंबर प्रतीच्या कांद्याला २००० ते ३००० रुपये व चार नंबर कांद्याला १ हजार ते २ हजार रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

अहिल्यानगर भागात अनेक दिवसांनंतर दरात बऱ्यापैकी वाढ होत आहे. यावर्षी नगर जिल्ह्यातील बहुतांश भागांत पाण्याची स्थिती चांगली असल्याने कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात असून यंदाही कांदा लागवडीचे क्षेत्र अधिक राहणार असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT