Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market : केळी दरात सुधारणा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Banana Export : जळगाव ः खानदेशात केळी दरात सुधारणा झाली असून, शिवार किंवा थेट खरेदीत निर्यातक्षम केळीला प्रतिक्विंटल कमाल २५५० रुपये दर मिळत आहे. कमी दर्जाची केळी फारशी उपलब्ध नाही. परंतु काश्मीर, दिल्ली येथे पाठवणुकीच्या केळीसही २४०० ते २२०० रुपयांचा दर मिळत आहे.

केळी दर मागील दीड महिन्यापासून दोन हजार रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. केळीला उठाव कायम आहे. उत्तरेकडे दिल्ली, पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेशात रोज ८० पेक्षा अधिक ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची पाठवणूक खानदेशातून केली जात आहे. तसेच राज्यातही केळीस उठाव आहे. नागपूर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागांतही केळीची पाठवणूक खानदेशातून सुरू आहे. केळीची आवकही सध्या रोज १२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी स्थिर आहे.

मध्य प्रदेशात केळीची आवक अधिक आहे. तेथेही रोज १२५ ते १३० ट्रक केळीची आवक होत आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत लिलावात केळीस २६९१ रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर मंगळवारी (ता. २७) मिळाला. केळीची आवक तेथेही टिकून आहे. खानदेशात सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, जळगाव, यावल, धुळ्यातील शिरपूर या भागात केळीची आवक होत आहे. तर रावेर, मुक्ताईनगर भागातही केळीची आवक सुरू आहे. कांदेबाग केळीची काढणी चोपडा, जामनेर, पाचोरा आदी भागात सुरू आहे. यंदा आवक टिकून आहे. परंतु उठाव असल्याने दरही स्थिर आहेत. दर्जेदार केळी खानदेशात सध्या उपलब्ध आहेत.

निर्यातही सुरूच
खानदेशातून केळीची निर्यातही सुरू आहे. निर्यातक्षम केळी कमी उपलब्ध आहेत. परंतु सध्या रोज सात ते आठ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. चोपडा, यावल, जामनेर, भडगाव-पाचोरा आदी भागांत निर्यातक्षम केळी आहेत. या केळीस कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार

Crop Damage : खानदेशात पावसाने पीकहानी सुरूच

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

SCROLL FOR NEXT