MAFSU University Agrowon
ॲग्रो विशेष

MAFSU : ‘माफसू’चे संशोधित तंत्रज्ञान प्रसारात सांघिक प्रयत्नांची गरज

MAFSU Research Technology : सुदृढ व अधिक दूध देणाऱ्या जनावरांसाठीचे पूरक तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोचविण्याकरिता सांघिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्‍त केले.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भ, मराठवाड्यात शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासोबतच राज्यातही अनेक शेतकऱ्यांच्या समृद्धीचा दुग्ध व्यवसाय हा सक्षम पर्याय ठरला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुदृढ व अधिक दूध देणाऱ्या जनावरांसाठीचे पूरक तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोचविण्याकरिता सांघिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्‍त केले.

महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापनदिन रविवारी (ता.३) साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातील कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठ परिसरात ध्वजवंदन करण्यात आले.

त्यानंतर आयोजीत कार्यक्रमात कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की ‘माफसू’कडून पोल्ट्री, डेअरी क्षेत्रातील सर्वच घटकांकरिता विविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या आयव्हीएफ तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार होण्याकरिता सर्वांनी सांघिक प्रयत्न करावे. माफसू अंतर्गत असलेल्या ‘केव्हीके’चा देखील या कामी उपयोग करता येणार आहे. आयव्हीएफ सोबतच इतर सर्व प्रकारचे विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, महेश जावळे, अतुल ढोक यांच्यासह माफसूचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कर्मचारी, विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्रेंडली मॅच’

प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी असा दोन संघात क्रिकेट मॅच खेळविण्यात आली. या स्पर्धेत माफसू प्राध्यापकांचा संघ विजेता ठरला. कुलगुरूंच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT