Millets Day Agrowon
ॲग्रो विशेष

Nutritious Millet : पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व

Team Agrowon

ए. ए. जोशी, डॉ. आर. बी. क्षीरसागर

पौष्टिक तृणधान्य पिकांना (Millet Crop) आपल्या आहारामध्ये (Millet Diet) अनन्यसाधारण महत्त्व आहे. भरडधान्य उत्पादनात (Millet Production) भारताचा वाटा ८० टक्के असून, जागतिक उत्पादनात २० टक्के वाटा आहे.

ज्वारी

प्रथिने, कॅल्शिअम, लोह, जीवनसत्त्व बी-१ बी-२, बी-३ आणि तंतुमय घटक भरपूर प्रमाणात आहेत. तंतुमय घटक हृद्य, मधुमेहासाठी उत्तम आहेत. शरीरातून घातक कोलेस्ट्रॉल एलटीएल कमी करते. यामुळे हाडे बळकट होतात.

जव

कार्बोहायड्रेट, प्रथिने, तंतुमय घटक, सोडिअम आणि मॅंगेनीज भरपूर प्रमाणात आढळते. हृदय विकार, उच्च रक्तदाबापासून वाचवते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

नाचणी

कॅल्शिअम, तंतुमय घटक, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम, तांबे, मँगेनीज, झिंक इ. आढळतात. मधुमेह, वजन कमी करण्यास लाभदायक असते.

बाजरी

प्रथिने, कॅल्शिअम, कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते. सांध्याची समस्या, ऑस्टियोपोरोसिसमध्ये अत्यंत लाभदायक आहे.

काकूम / कंगनी

सामान्यतः रवा किंवा तांदळाच्या पिठाच्या स्वरूपात उपलब्ध असते. त्यात रक्तातील साखर संतुलित करणारे निरोगी कार्बोहायड्रेट असते. लोह

आणि कॅल्शिअमचे प्रमाण प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात मदत करते. शरीरात एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते.

वरी

तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असून पोटॅशिअम, झिंक, लोह आणि कॅल्शिअमचे चांगले प्रमाण. जीवनसत्त्व बी आरोग्यासाठी उपयुक्त.

शरीरासाठी अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.

कुटकी

मॅग्नेशिअमचे मुबलक प्रमाण ­हदयाचे आरोग्य सुधारते. जीवनसत्त्व नायासीनमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून वजन कमी करण्यास मदत करते.

आहारातील महत्त्व

कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ, विविध खनिजे आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. यांच्या सेवनाने शरीराचे आरोग्य सुधारते.

तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्याने पचनक्षमता सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

पौष्टिक तृणधान्यामध्ये खनिजे व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असल्याने त्यांच्या सेवनाने जीवनशैलीशी निगडित आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. प्रतिकारक्षमता वाढते.

ग्लायसिमिक इंडेक्स कमी असल्याने वजन आटोक्यात राहते.

बाजरीचा उष्मांक जास्त असल्याने थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर असते. बाजरीच्या दाण्यापासून माल्ट तयार करता येतो. अँटिऑक्सिडंट घटकांचे भरपूर प्रमाण असून ते शरीरातील धोकादायक मुक्त कणांपासून पेशींचे संरक्षण करतात.

वरईमध्ये जीवनसत्त्व बी-३ जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पेलाग्रा या कुपोषणजन्य आजारापासून संरक्षण होते. तंतुमय पदार्थ जास्त असल्याने बध्दकोष्टतेचा त्रास दूर होतो. यामध्ये जीवनसत्त्व क, अ आणि ई जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

नाचणीमध्ये असलेल्या लोह व कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात. अॅनिमिया रोगास प्रतिबंध होतो. वजन आटोक्यात राहते. हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT