Jowar Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Market : खानदेशात दादर ज्वारीची आवक वाढली

Jowar Rate : दरात घट; प्रतिक्विंटल २२०० ते ३३०० रुपये भाव

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीची आवक या आठवड्यात वाढली आहे. रोज दोन हजार क्विंटल दादर ज्वारीची आवक प्रमुख बाजार समित्यांत होत असून, दर २२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दर यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहेत.

दादर ज्वारीची आवक मगील महिन्यातच सुरू झाली आहे. सुरुवातीला प्रतिदिन ३०० ते ३५० क्विंटल अशी आवक विविध बाजारांत सुरू होती. परंतु आवकेत या आठवड्यात वाढ झाली आहे. मळणीनंतर लागलीच बाजारात ज्वारी विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत खानदेशात पाऊस, गारपीट व वादळ झाले. यात बचाव झालेल्या भागात कापणी, मळणीचे काम गतीने झाले व बाजारात आवकही वाढली आहे.

सध्या चोपडा, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारातील नंदुरबार बाजार समितीत दादर ज्वारीची आवक बऱ्यापैकी होत आहे. ही आवक मागील महिन्यात सुरू झाली. त्यात दर दोन दिवसांनी वाढ झाली आहे.

चोपडा बाजार समितीत (Chopda Bajar Samiti) मंगळवारी (ता. ५) ४०० क्विंटल आवक झाली. दर २२०० ते ३३२६ व सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. दरही सुरुवाातीपासून कमी होत आहेत. सुरुवातीला किमान दर २३५० रुपये प्रतिक्विंटल व कमाल दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल होते. परंतु दरातही काहीशी घट झाली आहे.

कमाल दर फरसा किंवा सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे. परंतु आवक वाढल्यानंतर दरात आणखी घसरण झालेली नाही. मागील दोन-तीन दिवस कमाल दर ३३०० रुपयांवरच आहेत.

खानदेशात दादर ज्वारीची मळणी व कापणी सुरू आहे. विविध टप्प्यात ही कार्यवाही सुरू असून, आवक एप्रिलच्या मध्यापर्यंत सुरू राहील, अशी स्थिती आहे. कोरडवाहू क्षेत्रातील बारीक दाण्यांच्या दादरीला चांगला दर आहे. टपोरा दाणा व अधिक शुभ्रतेच्या दादर ज्वारीचे दर कमी आहेत.

दादर ज्वारीसाठी चोपडा व जळगाव (Jalgaon) येथील बाजार प्रसिद्ध आहेत. शिरपुरात तुलनेत आवक कमी आहे. या भागात पेरणी कमी असल्याने आवकही कमी आहे. सर्वाधिक आवक जळगाव व चोपडा येथे होत आहे. चाळीसगाव व भडगाव बाजारातही आवक बरी आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT