Bajara Market Agrowon
ॲग्रो विशेष

Bajara Market : खानदेशात बाजरीची आवक वाढली

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Bajara Production : जळगाव ः खानदेशात मागील चार ते पाच दिवसांत बाजरीच्या आवकेत सतत वाढ झाली आहे. प्रमुख बाजार समित्यांत मिळून सध्या तीन हजार क्विंटल बाजराची आवक रोज होत आहे. दरातही किंचित घट झाली आहे.

बाजरीचे किमान दर २०५० रुपये तर कमाल दर २२५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मध्यंतरी किमान दर २१०० रुपयांपर्यंत आणि कमाल दरही २३०० रुपयांवर होते. आवक वाढल्याने दरातही किंचित घट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सध्या सर्वाधिक आवक जळगाव जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव व अमळनेर या बाजारांत बाजरीची आवक अधिक आहे. चाळीसगाव भागात रोज ८०० ते ९०० क्विंटल बाजरी येत आहे. चोपडा बाजार समितीतही मागील चार दिवस प्रतिदिन सरासरी ४०० क्विंटल बाजरीची आवक झाली आहे. तसेच धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारातील शहादा भागातही बाजरीची आवक आहे.


बाजरीची मळणी पूर्ण
बाजरीची मळणी या महिन्यात सर्वत्र पूर्ण झाली आहे. यंदा पेरणी स्थिर होती. अनेकांनी चारा व धान्यासाठी पेरणी केली होती. तर केळी पट्टा किंवा तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात बेवड म्हणून बाजरीची पेरणी झाली होती. उत्पादनही यंदा बरे आहे. मळणी मागील महिन्याच्या अखेरीस सुरू झाली. पेरणी विविध टप्प्यांत झाल्याने मळणी या महिन्याच्या मध्यातही सुरू होती. काही शेतकऱ्यांचे बाजरी पीक अद्याप शेतात आहे. जशी मळणी सुरू झाली, तशी बाजारातील आवकही मागील महिन्यात सुरू झाली. ती हळूहळू वाढली. पुढील आठवड्यात आवक कमी होऊ शकते, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

Primary Education : हृदय तृप्त करणारे हवे शिक्षण

Market Committee Council : परिषदेचा उठलेला ‘बाजार’

Agriculture Department : अधिकाऱ्यांच्या पदनाम बदलाच्या मागणीस कृषिमंत्र्यांचा दुजोरा

SCROLL FOR NEXT