Humani  Agrowon
ॲग्रो विशेष

हुमणीच्या नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करण्याचे धोरण राबविणार

न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू २०२२-२३ हंगामामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण योजनेअंतर्गत हुमणीचे भुंगेरे (किडे) गोळा करण्याचे धोरण राबविणार आहोत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात हुमणीचा (Humani) मोठ्या प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना (Raosahebdada Pawar Sugar mill ) चालू २०२२-२३ हंगामामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण योजनेअंतर्गत हुमणीचे भुंगेरे (Humani Beetal) (किडे) गोळा करण्याचे धोरण राबविणार आहोत. त्यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण योग्य वेळीच करणे सुलभ होईल, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

घोडगंगा साखर कारखाना कार्यक्षेत्रात मागील दोन-तीन वर्षांपासून ऊस पिकामध्ये अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदलामुळे हुमणी (उन्नी) या किडीचा प्रादुभाव मोठ्या प्रमाणावर होऊन त्याचा परिणाम उसाचे एकरी उत्पादनात घट होण्यामध्ये झालेला आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून फार मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव झालेला असल्याने ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हुमणी किडीचे भुंगेरे माहे मे व जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर रात्रीचे वेळी जमिनीतून बाहेर पडून, कडुनिंब, बोर, बाभूळ इ. झाडांची पाने खाण्यासाठी येतात. खाल्लेल्या पानांचा भाग अर्धचंद्राकृती दिसतो तसेच भुगेरे तपकिरी अथवा काळ्या रंगाचे असतात.

सूर्यास्तानंतर हे भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात व सुर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत जातात. रात्रीचे वेळी (रात्री ७ ते ८) झाडावर जमलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा व भुंगेरे गोळा करण्याचे काम १ जून ते १५ जुलै २०२२ पर्यंतच्या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. त्यादृष्टिने सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेऊन सहकार्य करावे. या कीडनियंत्रण कार्यक्रमांतर्गत हुमणीचे भुंगेरे मुख्य शेतकी कार्यालयामध्ये जमा करणाऱ्या शेतकऱ्यांस कारखान्यामार्फत प्रती किलो रु. ३५० या प्रमाणे रक्कम देण्यात येणार आहे. संबंधित भुंगेरे गोळा करणेची कीड नियंत्रण योजना सामुदायिकरीत्या राबविणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कृपया एकात्मिक कीड नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन, हुमणी किडीपासून होणारे नुकसान टाळून ऊस उत्पादन वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्यांच्या प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरविणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

Dairy Farming: पशुपालनात दैनंदिन व्यवस्थापनाला प्राधान्य

Farm Land Corporation : शेती महामंडळाची जमीन कसायला द्या

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढउतार; हळद-उडीद स्थिर, आले वाढले तर पपईचे दर टिकून

SCROLL FOR NEXT