Weather Summer Update agrowon
ॲग्रो विशेष

Weather Summer Update : उन्हाच्या चटक्यांनी महाराष्ट्र होरपळणार हवामान विभागाचा अंदाज

Summer Update : देशातील अनेक राज्यांना उन्हाचा चटका जाणवणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Hot Summer Update : यावर्षी उन्हाच्या चटक्यांनी महाराष्ट्र होरपळणार असून, राज्याच्या विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटा येतील, असा मार्च ते मे दरम्यानच्या उन्हाळ्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने काल(ता. ०२) शुक्रवारी वर्तविला. देशातील अनेक राज्यांना उन्हाचा चटका जाणवणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

भारतीय हवामान खाते आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे २०१६ पासून प्रत्येक ऋतुच्या सुरुवातीला हवामान अंदाज वर्तविण्यात येतो. 'मल्टी मॉडेल एन्सेम्बल'च्या (एमएमई) आधारावर हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देश आणि विदेशातील हवामान संस्था आणि संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या विविध प्रारुपांच्या आधार घेण्यात आला आहे.

त्यात 'मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम' (एमएमसीएफएस) याचाही समावेश आहे. या अंतर्गत मार्च ते मे या कालावधीतील उन्हाळ्याचा आणि प्रकर्षान मार्चमधील हवामानाच्या स्थितीचा अंदाज यात वर्तविण्यात आला आहे. मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल राज्याच्या बहतांश भागात मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल.

ओडिशा आणि त्याच्या जवळच्या भागात उष्णतेच्या लाटा येतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त असतील, त्यामुळे यंदाचा उन्हाळा देशातील नागरिकांना होरपळून काढणारा ठरेल. ईशान्य भारत, पश्चिम हिमालय क्षेत्र, दक्षिणेकडील राज्यांचा काही भाग पश्चिम किनाऱ्यावर तुलनेने उन्हाचा चटका कमी असेल.

पुढच्या ४८ तासात पावसाची शक्यता

देशाच्या विविध भागात पुढील ४८ तासांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाचा हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.

गारपिटीमुळे विदर्भात पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुढील ४८ तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT