Illegal transport Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Mining : अवैध वाळू उपशाचा सोलापूर जिल्ह्यात सुळसुळाट

वाळूचे यापुढे लिलाव बंद करून शासनाकडूनच गरजूंना स्वस्तात वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने आणले आहे.

Team Agrowon

Solapur News : वाळूचे यापुढे लिलाव बंद करून शासनाकडूनच गरजूंना स्वस्तात वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने आणले आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणात मध्यरात्री अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. ग्रामीण पोलिसांनी मागील २२ दिवसांत कारवाई करीत तब्बल ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील भोसे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीच्या पात्रातून पहाटेच्या सुमारास भोसे पाटीजवळून वाळू घेऊन एक ट्रक भरधाव वेगाने करकंबच्या दिशेने जात होता.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहन अडवले. त्यामध्ये चार ब्रास वाळू मिळून आली.

शिरढोण (ता. पंढरपूर) येथून भीमा नदीच्या पात्रातून काढलेली वाळू बेकायदेशीरपणे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे ट्रक चालकाने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता.

पोलिसांनी ट्रकसह वाळू, असा एकूण १५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय अर्जुन चव्हाण (रा. पंढरपूर) असे संशयिताचे नाव आहे.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार बिराजी पारेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे यांच्या पथकाने पार पाडली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मागील काही दिवसांत अनेकदा कारवाया केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, या कारवाया पंढरपूर तालुक्यातच झाल्या आहेत.

रात्री साडेबारानंतर चालतो अवैध प्रकार

बेकायदेशीर वाळू उपसा करून कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना वरदहस्त कोणाचा? याचे उत्तर शोधण्याची खरी गरज आहे.

महसूल प्रशासन काय करतंय?

जिल्ह्यात प्रामुख्याने सीना व भीमा नदीतून अवैधरीत्या बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. त्यात पंढरपूर तालुक्यातील भोसे, सरकोली, करकंब, मोहोळ तालुक्यातील टाकळी, विरवडे, मनगोळी (वाळूज), दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर, औज, अशा ठरावीक ठिकाणांचा समावेश आहे.

पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जाते, पण महसूल प्रशासनातील अधिकारी या कारवाईवेळी कुठेच दिसत नाहीत. वाळू उपसा होणार नाही, याची दक्षता घेण्याची प्रमुख जबाबदारी ‘महसूल’ची आहे. तरीसुद्धा अवैध वाळू उपसा सुरूच आहे, हे विशेष.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT