Sand Excavation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Mafia : शिंदोडी परिसरात वाळूमाफियांचा धुडगूस

Sand Excavation : शिंदोडी व गुनाट (ता.शिरूर) हद्दीतील घोडनदी पात्रात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत.

Team Agrowon

Pune News : शिंदोडी व गुनाट (ता.शिरूर) हद्दीतील घोडनदी पात्रात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. बेसुमार वाळू उपसा करण्याबरोबरच हेच वाळू माफिया शेतकऱ्यांच्या शेतातून, प्रसंगी उभ्या पिकातून वाळू वाहतूक करत आहेत.

वाळू माफियांच्या अशा राजरोसपणे सुरू असलेल्या धुडगुसामुळे शेतकरी घाबरले आहेत. ‘‘साहेब, काही पण करा! पण या वाळू माफियांना आवर घाला.’’ असे लेखी अर्ज महसूल विभागाकडे येथील शेतकरी करत आहेत. पीडित शेतकरी भीवसेन कोळपे यांनीही महसूल विभागाला लेखी अर्ज करून साकडे घातले आहे.

शिंदोडी गुनाट हद्दीत सध्या घोडनदीचे पाणी खालावत चालल्याने वाळू माफियांची बेकायदा वाळू काढण्यासाठी चढाओढ लागली आहे. रात्री चार ते पाच बोटींतून येथे बेसुमार वाळू काढली जाते. तर वाळूच्या वाहतुकीसाठी रस्ताच नसल्याने हे वाळू माफिया थेट शेतकऱ्यांच्या शेतातूनच वाळूची वाहतूक करत आहे.

कोळपे यांच्या नदीलगत असलेल्या गट क्रमांक १६१ व गट क्रमांक १६२ या शेतातून वाहतूक केल्याने जलवाहिनीचे नुकसान झाले आहे तर जमीनही कसण्यासाठी अयोग्य बनली आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

वाळूमाफियांच्या मनमानीमुळे माझ्या शेतीचे मोठे नुकसान तर झाले आहेच. प्रसंगी जिवाची भीतीही वाटत आहे. महसूल विभागाला मी तसा अर्जही दिला. मात्र काही क्षणातच ही यंत्रणा सक्रिय झाली आणि वाळूमाफियांना ही बातमी समजली. महसूल विभागाला हुलकावणी देणारे वाळूमाफिया आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठले की काय?
-भीवसेन कोळपे, पीडित शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : ला नीना असूनही उष्णतेचा कहर; २०२५ तिसरे सर्वाधिक उष्ण वर्ष

River Conservation: शाश्‍वत नदी व्यवस्थापनासाठी ग्रामीण-नागरी समन्वय हवाच!

Local Body Election: गोंधळात मतांचा टक्का घसरण्याची भीती

Green Village: पर्यावरण संवर्धनाचा आदर्श बनलेले पुनर्वसित डिचोली

Sweet Sorghum: कथा गोड ज्वारी संशोधन विकासाची

SCROLL FOR NEXT