Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Cotton Seeds : खानदेशात अवैध कापूस बियाणे होऊ लागले दाखल

Cotton Seeds Update : खानदेशात गुजरात व मध्य प्रदेशातील देशी कापूस व तणनाशक सहनशील (एचटीबीटी) कापूस बियाणे मध्य प्रदेशातून दाखल होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गुजरात व मध्य प्रदेशातील देशी कापूस व तणनाशक सहनशील (एचटीबीटी) कापूस बियाणे मध्य प्रदेशातून दाखल होत आहे. प्रशासनाने सीमांत भागात तपासणी, भरारी पथकांची नियुक्तीसंबंधी कार्यवाही केली आहे. परंतु अवैध कापूस बियाणे दाखल होत असल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

अलीकडेच नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने अवैध कापूस बियाण्यासंबंधी कारवाई केली आहे. परंतु या कारवाईपूर्वी अवैध कापूस बियाणे नंदुरबार, धुळे व जळगावात दाखल झाले आहे. त्याची विक्री ग्रामीण भागात सुरू आहे.

जिल्ह्यात किंवा खानदेशात प्रशासनाकडून १ जूनपासून कापूस बियाण्याची कृषी केंद्रांत विक्री करण्याचे आदेश आहेत. परंतु खानदेशात आगाप कापूस लागवड १५ ते २५ मे या कालावधीत मोठ्या क्षेत्रात केली जाते. त्यासाठी अधिकृतपणे बियाणे स्थानिक भागात उपलब्ध होत नसल्याने बियाण्यांचा काळाबाजार सुरू आहे. खानदेशात दरवर्षी नऊ ते साडेनऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते.

यात सुमारे दोन ते सव्वादोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड केली जाते. या बागायती लागवडीसाठी अवैध कापूस बियाण्याचा उपयोग होत असल्याची स्थिती आहे. नंदुरबारात गुजरातमधून अवैध बियाणे येत आहेत. अनेक अवैध बियाणे पुरवठादारांनी आपले एजंट खानदेशात नेमले आहेत. या एजंटना प्रतिपाकिट ३०० ते ४०० रुपये दर पडतो.

पुढे या पाकिटाची विक्री १२०० ते १४०० रुपये प्रतिपाकिट या दरात केली जाते. कोट्यवधींची उलाढाल व लुटालूट यातून होत आहे. नंदुरबारातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, अमळनेर, धरणगाव या भागात अवैध बियाणे चोरट्या मार्गाने दाखल झाल्याची कुजबुज आहे. मागील हंगामात अवैध बियाण्याच्या लागवडीने अनेकांचे नुकसान झाले. कारण हे बियाणे, त्याचा दर्जा याची कुठलीही हमी नाही. विनापावती ते शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते.

कृषी विभाग नामानिराळा...

नंदुरबारातील शहादा, धुळ्यातील शिरपूर व जळगावातील चोपडा या शहरांत या बियाण्याचा पुरवठा व अन्य हालचालींचे केंद्र तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी हा प्रकार होत आहे. परंतु जुजबी कारवाई करून प्रशासन, कृषी विभाग नामानिराळा होतो, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT