Shaktipeeth Project Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Project : ‘शक्तिपीठ’ प्रकल्प रेटल्यास सरकारला फिरणे कठीण करू

Kisan Sabha : शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ द्रुतगती राज्य महामार्ग रेटून करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Team Agrowon

Sangli News : शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ द्रुतगती राज्य महामार्ग रेटून करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. किसान सभा जागोजागी तीव्र आंदोलन करेल आणि सरकारमधील घटकांना फिरणे अवघड होईल, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला.

देशमुख यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाची नवीन आखणी करण्यात येईल. जिथून विरोध होणार नाही, अशा जिल्ह्यांतून महामार्ग नेऊ, असा नवा प्रस्ताव समोर येत आहे. हा प्रस्ताव राज्यातील कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्यास देशोधडीला लावणाराच आहे. शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणार, पण महामार्ग करणारच, असा त्याचा अर्थ आहे.

शक्तिपीठ महामार्गाला नाहक विरोध केलेला नाही. या महामार्गात बागायती जमिनी जाणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात सगळे बागायती जिल्हे आहेत. बागायती जमिनी घेऊन मुख्यमंत्री कोणाचा आणि कसला विकास करणार आहेत? देवस्थाने जोडण्यासाठी तुम्ही महामार्गाची आखणी करीत आहात.

ती देवस्थाने जोडण्यासाठी रत्नागिरी-नागपूर महामार्ग आहेच की. त्याला उपमहामार्ग करा. दुसरा महामार्ग करण्याचा अट्टाहास कशासाठी? ज्या ठिकाणाहून तुम्ही महामार्गाची नवीन आखणी कराल, त्या ठिकाणचे शेतकरी तुमच्या विरोधात उभे राहतील. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू. त्या जिल्ह्यात सरकारला फिरणे कठीण करू, असा इशारा देशमुख यांनी पत्रकात दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT