Jayant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Collection : दूध संकलन वाढल्यास विक्रीत वाढ ः जयंत पाटील

Jayant Patil : आपल्या दूध सोसायटीने स्वतःचे दूध संकलन वाढवले तर दूध संघाचेही दूध संकलन वाढणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Sangli News : ‘मार्केटिंगची वेगवेगळे तंत्र, मार्ग या सर्वांचे अवलोकन करून दूध संघाने दूध संकलन वाढवणे गरजेचे आहे. दूध संकलन कसे वाढेल व त्याची विक्री कशी वाढेल यासाठी दूध संघाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

आपल्या दूध सोसायटीने स्वतःचे दूध संकलन वाढवले तर दूध संघाचेही दूध संकलन वाढणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

येथील राजारामबापू सहकारी दूध संघाच्या ५० व्या वार्षिक सभेत पाटील बोलत होते. या वेळी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष शशीकांत पाटील, संचालक विनायक पाटील, कार्यकारी संचालक डॉ. एस. डी. ढोपे, बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाटील म्हणाले, ‘राज्यात शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान दिले. त्यामुळे मुंबईच्या बाजारपेठेत दुधाचा पुरवठा वाढला. त्यात गुणवत्ता किती हा संशोधनाचा विषय आहे. राजारामबापू दूध संघाने दूध दर देताना उत्पादकांना समान दर दिला आहे. अतिरिक्त दूध झाले तर पावडरीची निर्मिती केली जाते.

पण आपल्याकडे दुधाचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. दरवर्षी आपण दूध वाढ संकलनाचा संकल्प करतो, पण ते होत नाही, याकरिता दूध उत्पादक संस्थानी पुढाकार घेतला पाहिजे. सध्या दराच्या बाबतीत कमी अधिकपणा जाणवत असला तरी आगामी काळात दूध वाढल्यानंतर दर मिळेल.’

प्रतिक पाटील म्हणाले, ‘दूध पावडरचा बाजारपेठेत दर कमी असल्यामुळे आपण पॅकिंग दूध विक्रीकडे भर दिला पाहिजे. एक लाखाहून अधिक पँकिग दूध विक्रीचे उद्दिष्ट आहे.’

नेताजी पाटील म्हणाले, ‘दूध संघाने कोकणासह मुंबई बाजारपेठ तसेच औरंगाबाद येथे विक्री वाढवली आहे. गायीच्या दुधापेक्षा म्हैस दूध संकलन वाढणे आवश्यक आहे. यासाठी म्हैस खरेदीसाठी दूध संघामार्फत अनेक बँका अर्थसाह्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.’ या वेळी विजय पाटील, सुस्मिता जाधव, कमल पाटील, सुनीता देशमाने, उज्ज्वला पाटील आदींसह दूध उत्पादक सभासद, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT