Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Supriya Sule : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील

Farmers Issue : विधानसभेची ही लढाई राज्यातील भ्रष्टाचार व महागाई कमी व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतीमाल व दुधाला चांगला बाजारभाव मिळवा तसेच तरुणांना रोजगाराची संधी मिळावी या साठी आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : विधानसभेची ही लढाई राज्यातील भ्रष्टाचार व महागाई कमी व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतीमाल व दुधाला चांगला बाजारभाव मिळवा तसेच तरुणांना रोजगाराची संधी मिळावी या साठी आहे. आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी केली जाईल असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी राणी लंके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळाली. गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राणी लंके यांनी पारनेर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आमचे सरकार आले तर शेतक-यांचे कर्ज सरसकट माफ करू, दुधाला व कांद्याला बाजारभाव देऊ महागाई बेरोजगारी व भ्रष्टाचार कमी करु.

महाविकास आघाडी भ्रष्टाचार व महागाई कमी व्हावी ,शेतक-यांच्या शेतीमाल व दुधाला चांगला बाजारभाव मिळवा तसेच तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी काम करत आहे. माझे ८० वर्षाचे वडील फक्त दिल्ली पुढे झुकले नाहीत म्हणून त्यांना कोर्टात ऊभे केले. त्यांचा घात केला आमचा पक्ष चोरला चिन्ह चोरले आम्हाला कोर्टात खेचले पण त्याने काय फरक पडणार आहे ही लढाई तत्त्वाची आहे

राज्यातील जनता स्वाभिमानी आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने महायुती सरकारला त्यांची जागा दाखविली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी बहिणी लाडक्या नव्हत्या का?,

बहिणींनी हिसका दाखविल्यावर बहिणी लाडक्या झाल्या, मात्र बहिणीसाठी दिली जाणारी भाऊबीज ही आमच्या कराच्या रकमेतून दिली जात आहे. ते त्यांच्या खिशातून देत नाहीत, त्यामुळे आमच्या बहिणी यावेळी फसणार नाहीत. यावेळी नीलेश लंके यांचेही भाषण झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season 2024 : शिरोळ्यात १० हजार हेक्टरवरील रब्बी पेरण्या रखडल्या

Paddy Harvesting : पावसाची उघडीप; भातपीक कापणीला वेग

Crop Insurance : तीन हजार भात उत्पादकांनी नोंदविल्या नुकसानीच्या सूचना

Agrowon Podcast : ज्वारीचा बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे आले दर?

Sugarcane Bill : पडळ कारखान्याकडून १५१ प्रमाणे बिल जमा

SCROLL FOR NEXT