Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate : मी सदैव महाराष्ट्राच्या बळीराजासाठी तत्पर असेन

Agriculture Minister : फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज असून. यासाठी मी सदैव महाराष्ट्राच्या बळीराजासाठी तत्पर असेन.

Team Agrowon

Nashik News : फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज असून. यासाठी मी सदैव महाराष्ट्राच्या बळीराजासाठी तत्पर असेन. राजकारण हे विकासाचे असून, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन वाटचाल करायची असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

सिन्नर तालुका सत्कार समितीच्या वतीने सोमवारी (ता. २३) कृषिमंत्री कोकाटे यांचा सिन्नर येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार डॉ. सुरेश चव्हाणके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे व नागरी समितीचे सदस्य उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक क्रांती घडवली यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने व त्यानुसार आवश्यक बदल येणाऱ्या काळात केले जातील. शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.

शेतकऱ्याचा अगोदर सन्मान, नंतर घेतला सत्कार

सिन्नरला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यात जल्लोष असल्याने राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या दिवशी सिन्नरकरांनी मंत्री कोकाटे यांचा भव्य सत्कार ठेवला होता. या वेळी ‘‘माझा सत्कार होण्याअगोदर एका शेतकऱ्याचा सत्कार होणे तितकेच क्रमप्राप्त असल्याचे अॅड. कोकाटे यांनी सांगताच तालुक्यातील बबन काशिनाथ खैरनार या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT