Watermelon Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Crisis: शेकडो टन कलिंगडे शेतातच कुजली

Farmer Losses: मे महिन्यात पर्यटन हंगाम आणि मुंबईकरांच्या गर्दीच्या अपेक्षेने लागवड केलेली शेकडो टन कलिंगडे मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतातच कुजली.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: पर्यटन हंगाम आणि मुंबईकरांची होणारी गर्दी यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन मिळेल या अपेक्षेने लागवड केलेली शेकडो टन कलिंगडे मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतातच कुजली गेली आहेत. एक हजार टन कलिंगडे कुजल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कलिंगड लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पेंडुर, विलवडे, बिबवणे, झाराप, गडमठ, नांदगाव, तिथवली, नांदोस यांसह अनेक गावांमध्ये कलिंगड उत्पादन घेतले जाते. नोव्हेंबर महिन्यांपासून कलिंगड लागवडीला सुरुवात होते. नोव्हेंबर ते जानेवारी आणि फेब्रुवारी ते मे अशा दोन टप्प्यांत कलिंगड लागवड होते.

अनेक शेतकरी कुणकेश्‍वर यात्रा, आंगणेवाडी यात्रा कालावधी नजरेसमोर ठेवून लागवड करतात. याशिवाय मेमध्ये जिल्ह्यात येणारे पर्यटक आणि मुंबईकरांच्या गर्दीचा विचार करून लागवड केली जाते. या कालावधीत कलिंगडला चांगला दर मिळतो. या वर्षी देखील शेकडो शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून २० मेपर्यंत उत्पादन मिळेल असे नियोजन करीत लागवड केली होती.

पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापासून उत्पादनाला सुरुवात झाली. काहींनी काढणी सुरू केली होती, परंतु काही भागांत ८ रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कलिंगडाची मागणी घटली. सिंधुदुर्गातील अधिकतर कलिंगडे गोव्यात पाठविली जातात.

मात्र यंदा पावसामुळे मागणी ठप्प झाली. २० मेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो टन कलिंगडे शेतातच कुजण्याची प्रकिया सुरू झाली. जिल्ह्यात १ हजार टनांपेक्षा अधिक कलिंगड शेतातच कुजून गेले असून, लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. मात्र कृषी विभागाने काही अपवाद वगळले तर या नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत.

ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली, त्यांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. यात आंबा, काजू, कलिंगड अशा सर्व पिकांचा समावेश आहे. कृषी सहाय्यकांना पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
- निरंजन देशमुख, तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी
मी गडमठ येथे आठ एकरांमध्ये कलिंगड शेती करतो. मे महिन्याचा हंगाम मिळावा या हेतूने लागवड केली होती. साधारणपणे ९० ते १०० टन कलिंगड शेतात असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ८ ते १० रुपये असलेला दर तीन-चार रुपयांवर आला. त्यानंतर त्या दराने देखील कोणी कलिंगडे घेतली नाहीक. सर्व पीक शेतातच कुजले आहे.
- दीपक कासोटे, कलिंगड उत्पादक, गडमठ, ता.वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT