Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

Unseasonal Rain Buldhana : फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातील झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार तडाखा दिला आहे. अवकाळी, वादळी वारा आणि गारपिटीमुळे येथे रब्बी पिकांसह फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून शकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : अकोला, बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी येथे विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या झालेल्या पावसाने बुलढाणा, खामगाव, चिखली, नांदुरा या तालुक्यात शेतीचे शेकडो हेक्टर नुकसान झाले आहे. तर शेगाव तालुक्यातील टाकळी येथील विरो शिवारात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. त्याचे नाव सूरज सुभाष निंबाळकर (वय २२) असून तो पंपावर काम करीत होता.

बुलढाण्यात १५ फेब्रुवारीच्या सायंकाळी व रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा अवकाळी जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, चिखली, नांदुरा या तालुक्यात झाला. यामुळे ४८ गावातील १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांचं नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत समोर आले आहे.

कृषी विभागाने ही पाहणी शुक्रवारी (१६ रोजी) केली. या पाहणीत ४८ गावांना अवकाळीचा फटका बसल्याचे समोर येत आहे. तसेच येथे १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा व मका या पिकासह फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

सर्वाधिक तडाखा हा बुलढाणा तालुक्याला बसला असून येथे ४०५ हेक्टरवरील रब्बी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. येथे गहू, शाळू, मका व हरभरा या पिकांची मोठी नासाडी झाल्याचा अहवाल कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना सादर केला आहे.

वाशीममध्ये शेतमाल भिजला

वाशीममध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीत ठेवलेला शेतमाल भिजला. येथे खरेदी-विक्रीसाठी ठेवलेली सुमारे ५०० पोत्यातील शेतमाल भिजला. हा शेतमाल झाकण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वेळ मिळू शकला नाही. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT