Parbhani News: परभणी जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, हळद आदी पिकांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. टाकळखोपा (जिंतूर) येथील सोयाबीनमध्ये हुमणी कीडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असून प्रादुर्भावाचा उद्रेक (आउटब्रेक) झाला आहे. यामुळे सुमारे २०० ते २५० हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
टाकळखोपा येथे यंदाच्या खरिपात ८४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ३६१ हेक्टर त्यापैकी २०० ते २५० हेक्टर सोयाबीन बाधित झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या संपूर्ण सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी (ता. २४) परभणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीकसंरक्षक विशेषज्ञ डॉ. अमोल काकडे, मंडल कृषी अधिकारी पी. एस. पाईकराव, उपकृषी अधिकारी पी. ए. देवकर, सहायक कृषी अधिकारी गजानन घुगे यांनी टाकाळखोपा येथे भेट देऊन शेतकऱ्यांना हुमणी कीडीच्या व्यवस्थापनाबाबत उपाययोजना सांगितल्या. परंतु त्यानंतरही हुमणीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले. हुमणी बाधित क्षेत्राचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हुमणीमुळे आमच्या गावातील ७० हून अधिक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे शंभर टक्के, तर काहींचे ३० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी.मारुती घुगे, विश्वनाथ घुगे, टाकळखोपा, ता. जिंतूर, जि. परभणी
२०१४ ते २०२० मध्ये हळदीचे उत्पादन घेत होतो. परंतु हुमणीच्या प्रादुर्भावामुळे हळद लागवड बंद केली. मागील तीन वर्षांपासून सोयाबीनवर देखील प्रादुर्भाव होत आहे. गत वर्षी भुंगेऱ्यासाठी सापळे लावले होते. त्यामुळे कमी प्रादुर्भाव झाला. परंतु यंदा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.शरद घुगे, टाकळखोपा, ता. जिंतूर, जि. परभणी
टाकळखोपा येथील हुमणी कीड बाधित सोयाबीनची पाहणी केली. या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना उपायजोजना सांगितल्या. पावसाच्या खंडामुळे हुमणीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.डॉ. अमोल काकडे, पीक संरक्षक विशेषज्ञ, केव्हीके, परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.