Talasande KVK: तळसंदे कृषी विज्ञान केंद्राचा अठरा हजार शेतकऱ्यांशी संवाद

Farmer Empowerment: शेतकऱ्यांना आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांची कृषी उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात आला.
Farmer Empowerment
Farmer EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: शेतकऱ्यांना आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांची कृषी उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात आला. या माध्यमातून जिल्ह्यातील ९० गावांतील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, पुरस्कृत डी. वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, कृषी विभाग आणि आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून ९० गावांतील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

Farmer Empowerment
KVK Darwha: केव्हीके दारव्हाने पेरले समृद्धीचे बीज

शेतकऱ्यांना प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाचे महत्त्व, कृषी आधारित लघुउद्योग, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवस्थापन व विपणन कौशल्य याविषयी माहिती देण्यात आली. कृषीविषयक विविध शासकीय योजना, अनुदान, कर्ज सुविधा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यांची माहिती दिली गेली.

Farmer Empowerment
Baramati KVK: बारामती केव्हीकेचा ‘एनएएएस’कडून सन्मान

अभियान काळात डॉ. अरविंद कुमार वर्मा, डॉ. संजय कड, डॉ बशीत राजा, डॉ. सत्यवान आगिवले, डॉ. सुनील कराड, डॉ. संभाजी जाधव, अमोल मलकमीर, धनंजय पाटील यांचे सहकार्य लाभले.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयवंत जगताप, प्रा. सुधीर सूर्यगंध, प्रा. दीपक पाटील, प्रा. राजवर्धन सावंत भोसले, प्रा. दीपाली मस्के, डॉ. निनाद वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. गंगासागर मोर, प्रकाश पाटील, रोहन साळोखे, बाजीराव पाटील, राजू माने, आणि रवींद्र शिंदे यांनी नियोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com