Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : कसं जगायचं; मदत कधी देणार?

Drought Condition : यंदा दुष्काळाची भीषणता अनेक भागांत जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी प्यायला पाणी नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : यंदा दुष्काळाची भीषणता अनेक भागांत जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी प्यायला पाणी नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चारा नसल्याने जनावरे कशी सांभाळायचाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने जगण्याचा संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. खरिपाची पिके जळून खाक झाली.

या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी शेतकरी आपल्या व्यथा मांडत होते. आम्हाला प्यायला पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, अशी मागणी करण्यात आली.

परिस्थिती अवघड आहे, कसे जगायचे सांगा; सरकार कधी मदत देणार? अशी विचारणा केंद्रीय पथकाकडे शेतकरी करत होते. केंद्रीय पथक १३ व १४ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर होते. पहिल्या दिवशी मालेगाव तालुक्यातील आढावा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिन्नर व येवल्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली.

सिन्नर तालुक्यातील खोपडी, भोकणी, खंबाळे येथे दुष्काळाची पाहणी केली. भोकणी येथील सुकदेव सानप सांगत होते, पेरणीपुरता पाऊस झाला त्यात कशीबशी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाचा खंड पडल्याने ८० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन नुकसान आहे.

पीक जळून गेले, आता ज्वारी केली ती जनावरांसाठी आहे; पण पाण्यावाचून करपून चालली आहे. पेरणीचा खर्चसुद्धा वसूल नाही असे शेतकरी सांगत होते. येवल्यातील राजापूर, पन्हाळसाठे येथे शेवटी पथकाने पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT