Drought Crisis : दुष्काळामुळे पुढचे भवितव्य चिंताजनक ! केंद्रीय पथकाची वेगवान पाहणी

Team Agrowon

शेतकऱ्यांच्या हाताला काहीच नाही

उशिराने आलेला पाऊस, उशिरा झालेली पेरणी अन् मध्येच अवकाळीचा कहर त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला सध्या काहीच लागलं नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यासह केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा पाहताना नुकसान भरपाई द्यावी, त्यांनी भरीव मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Drought Crisis | Agrowon

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांची भेट

विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी आणि होत असलेल्या मागणीवरून हिवाळी अधिवेशनाच्या आधल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील ईसापूर तार्सा आणि निमखेडा तार्सा या गावांना भेट दिली.

Drought Crisis | Agrowon

केंद्रीय पथक दाखल

त्याप्रमाणे राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक बुधवारी (ता.१३) मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत दाखल झाले. यावेळी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पुढचे भवितव्य चिंताजनक आहे,’’ अशी व्यथा केंद्रीय पथकापुढे मांडून सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Drought Crisis | Agrowon

शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या

या पथकाकडून बुधवारी मराठवाड्यातील कामखेडा येथे केंद्रीय पथकाने वेगवान पाहणी केली. यापाहणीदरम्यान कामखेडा येथील गणेश मुठे व इतर शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Drought Crisis | Agrowon

प्रत्यक्ष दुष्काळाची पाहणी

केंद्रीय पथकातील हरीश उंबरजे व ए. एल. वाघमारे यांच्या द्विसदस्यीय पथकाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, दोनवाडा तसेच सोयगाव तालुक्यांतील जंगला तांडा, फर्दापूर, घनवट शिवार आदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दुष्काळ पाहणी केली.

Drought Crisis | Agrowon

पथकाने माहिती घेतली

दुष्काळामुळे झालेली पिकांची स्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई, टँकरने होणारा पाणीपुरवठा, जलसाठ्यांची स्थिती, शेततळ्यांची स्थिती आदींची माहिती घेतली.

Drought Crisis | Agrowon

शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची माहिती

पथकाने शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर पिकांच्या नुकसानीची व त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची माहिती जाणून घेतली. ही माहिती घेत असताना मागील वर्षीचे उत्पादन, यंदाचे सरासरी उत्पादनाची माहिती घेतली.

Drought Crisis | Agrowon

NEXT- जलद वाण पैदास प्रक्रिया व तंत्रज्ञानाची गरज

आणखी पाहा