Poultry Management Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Poultry Heat Stress : उष्माघातामुळे कोंबड्यांमध्ये मरतूक देखील दिसून येते. ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशावेळी कोंबड्यांमध्ये उष्णतेमुळे अधिक ताण दिसून येतो.

Team Agrowon

Poultry : राज्यात बहुतांश ठिकाणी वाढत्या कमाल तापमानामुळे उन्हाचा चटका कायम आहे. उष्ण वातावरणामुळे जनावरे, कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो त्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावरही परिणाम होतो. उष्माघातामुळे कोंबड्यांमध्ये मरतूक देखील दिसून येते. ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशावेळी कोंबड्यांमध्ये उष्णतेमुळे अधिक ताण दिसून येतो. कोंबड्यांतील ताणासाठी विविध घटक कारणीभूत ठरतात यापैकी उष्णतेचा ताण हा प्रमुख घटक आहे.

ज्यावेळी कोंबड्यांना शरीर तापमान नियंत्रित करणे आवश्यक असते, अशावेळी कोंबड्या शेडमध्ये वापरलेली गादी म्हणजेच जामिनावर अंथरलेले तूस हे बाजूला सरकवून जमिनीवर पंख पसरवून बसतात. कोंबड्या पाण्याचे पाइप, पाण्याची भांडी यांना स्पर्श करतात. अशा पद्धतीचा अवलंब करून कोंबड्या आपल्या शरिराचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.  तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या खाली असल्यास कोंबड्यांना उष्णतेचा ताण अधिक जाणवत नाही. मात्र तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढते, अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणे आवश्यक असते. छत थंड ठेवण्याकरिता छतावर सुक्या चाऱ्याचे आच्छादन करावे. शक्य असल्यास छतावर व पडद्यावर दिवसातून ३ ते ४ वेळेस पाण्याची फवारणी करावी.

वाढत्या तापमानात कोंबड्यांना सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत खाद्य द्यावे. दुपारच्या वेळात कोंबड्यांना खाद्य देऊ नये. कारण सकाळी कोंबड्यांच्या शरीरात उष्णता उत्पादन २० ते ७० टक्क्यांपेक्षा कमी असते.

खाद्याद्वारे निर्माण होणारी उष्णता थंड वेळेत दोन तासापर्यंत परिणाम दाखवते, तर वातावरणातील तापमान हे ३५ अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम १० तासापर्यंत असतो. म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी कोंबड्यांतील ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.

औषधोपचार करत असताना नंतर उपचार करण्याऐवजी कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व क आणि ई चा वापर करावा. जीवनसत्त्व ई चा साधारपणे २५० मि.ग्रॅ.प्रतिकिलो खाद्य आणि जीवनसत्त्व क चा वापर ४०० मि ग्रॅम प्रतिकिलो खाद्य करावा.सोबतच इलेक्ट्रोलाईटस व डेक्सट्रोज चा वापर अत्यंत आवश्यक आहे.

कोंबड्यांची शारीरिक ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक व संतुलित प्रमाणात सतत असणे आवश्यक आहे.अशावेळी प्रत्यक्ष कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा. याकरिता कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वनस्पती तेलाचा योग्य प्रमाणात वापर करावा.

कोंबड्यांतील उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा व संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा. यासाठी संत्री किंवा लिंबू ३० ते ४० ग्रॅम प्रति १०० कोंबडी या प्रमाणात वापरावे. उष्णतेचा ताण कमी करण्याकरिता लिंबू किंवा संत्र्याची साल देखील उपयुक्त आहे.

अश्वगंधा,तुळस,मंजिष्ठा,शतावरी या औषधी वनस्पतींचा वापर देखील कोंबड्यांच्या आहारातून करावा. अश्वगंधा- ४ ग्रॅम, तुळस-४ ग्रॅम, मंजिष्ठा-४ ग्रॅम, शतावरी-५ ग्रॅम घेऊन या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून १०० कोंबड्यांसाठी वापराव्यात.अशा प्रकारे उपाययोजना केल्यास कोंबड्यांना उष्णतेच्या ताणापासून वाचवता येते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT