How to make Dried Fig
How to make Dried Fig Agrowon
ॲग्रो विशेष

Dried Fig : सुके अंजीर कसं बनवाल ?

Team Agrowon

पोषणमुल्यांचा विचार करता अंजीर (Fig) हे अतिशय उपयुक्त फळ आहे. फेब्रुवारी–मार्च महिन्यात अंजीर फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते.

त्यामुळे भाव कमी मिळून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.अशावेळी सुके अंजीर तयार केल्यास शेतकऱ्यांना फायदा होवू शकतो.

सुक्या अंजीरांना चांगला भावही मिळतो. सुके अंजीर (Dried Fig) बनविण्याची प्रक्रिया काय आहे याविषयी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया. 

आपल्याकडे मिळणारे सुके अंजीर हे परदेशातून आलेले असतात.महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या अंजिराच्या जातींमध्ये एकूण विद्राव्य घटकांचे म्हणजेच टीएसएस च प्रमाण कमी असत.त्यामुळ चांगल्या प्रतीचे सुके अंजीर तयार होत नाही. 

त्यासाठी योग्य प्रक्रिया केल्यास योग्य दर्जाचे सुके अंजीर तयार होऊ शकत. सुके अंजीर तयार करण्यासाठी पूना फिग, दिनकर, फुले राजेवाडी इ. जातींची फळे निवडावीत.

प्रथम निरोगी, चांगली, एकसारखी पिकलेली अंजीर फळे निवडून घ्यावीत. निवडलेल्या अंजीर फळांमध्ये एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण (टीएसएस) १७ ते १८ ब्रिक्स दरम्यान असल्याची खात्री करावी. 

निवडलेली फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळे मलमलच्या कापडात बांधून पॉटेशिअम मेटाबायसल्फाइटच्या (१ टक्का) उकळत्या द्रावणात ८ ते १० मिनिटे धरावीत. त्यानंतर फळे थंड होण्यास ठेवून द्यावीत. 

फळे थंड झाल्यानंतर प्रतिकिलो फळांस गंधकाची (२ ग्रॅम याप्रमाणे) २ तास धुरी द्यावी. म्हणजे साठवणीच्या काळात बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. धुरी दिलेली अंजीर फळे ५० टक्के साखरेच्या पाकात २४ तास भिजत ठेवावीत. 

नंतर फळे पाकातून नितळून काढावीत. ही फळे ड्रायरमध्ये ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानास २४ ते ३६ तास ठेवावीत.

जेणेकरून फळांमधील पाण्याचे प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत येईल आणि फळे सुकतील.ड्रायर उपलब्ध नसेल तर फळे उन्हात वाळविली तरी चालतात.

मात्र उन्हामध्ये वाळविलेल्या फळांची गुणवत्ता चांगली मिळत नाही. तसच पाण्याच प्रमाणही १६ टक्क्यांपर्यंत आणण शक्य होत नाही.

वाळवलेली फळे थंड करून किचन प्रेसच्या साह्याने चपटी करून पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरावीत. पिशव्या हवाबंद करून थंड, कोरड्या जागी साठवून ठेवावीत.

साधारणपणे एक किलो अंजिरापासून २५० ग्रॅम सुके अंजीर मिळत.

ड्रायर उपलब्ध नसेल तर फळे उन्हात वाळविली तरी चालतात. मात्र उन्हामध्ये वाळविलेल्या फळांची गुणवत्ता चांगली मिळत नाही. तसच पाण्याच प्रमाणही १६ टक्क्यांपर्यंत आणण शक्य होत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT