Agricultural
Agricultural Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Story : शेतीत काम करण्याचं एवढं कौतुक कसलं?

Maharudr Mangnale

महारूद्र मंगनाळे

Rural Agricultural Story : शेतीतल्या कामांबद्दल शहरी लोकांना फारसं काहीच माहित नसतं. माझा शहरातला एक जवळचा मित्र आहे. तो फेसबुक मित्रही आहे. त्याचा शेतीशी कसलाच संबंध नाही. मी शेतीतील कामासंदर्भात पोष्ट टाकतो, तेव्हा त्याला कधी आश्चर्य वाटतं, तर कधी अविश्वास.

त्याला वाटतं, सरकारी वा खासगी नोकरीत असणारे बाबूही काम करतातच की...सगळ्यांनाच काम करावं लागतं...शेतीत काम करण्याचं एवढं कौतुक कसलं? मी त्याला दोन वर्षांपूर्वीच आमच्या शेतात यायचं निमंत्रण दिलंय.

तो अद्याप आला नाही. तो शेतीतील कामं जेव्हा एकदा डोळ्यानं पाहिल तेव्हा त्याला इतर कामं आणि शेतीतील कामं यातील फरक कळेल.

सकाळी ७ ते १०-३० असं सलग साडेतीन तास मी रोपांना आळी केली. दोन झाडांमधील तण काढून टाकलं. काही झाडांच्या आधारासाठी लावलेल्या काठ्या नीट केल्या. दोऱ्या नीट केल्या. काही रोपांच्या खालच्या कोवळ्या फांद्या काढल्या. साडेतीन तासात मी ६२ रोपांची ही अशी मशागत केली.

साधारण सहा फुटांवर एक रोप आहे. म्हणजे किमान ६२ वेळा मी बसलो आणि उठलो. खुरप्याने माती उकरली आणि हाताने लावली. जवळपास इतक्याच वेळा माझ्या गुडघ्याची हाडं वाजली. मान, पाठ ताठली. माती ओढून तळहाताची आग झाली.

हे साध्या शब्दात केलेलं वर्णन आहे. यात अतिशयोक्तीला जागा नाही. कुठलाही शहरी बाबू, ज्याला बऱ्यापैकी चरबी आहे, असा माणूस हे काम करू शकत नाही.

मजूर लावून हे काम करायची, त्यासाठी चांगली मजुरी देण्याची माझी तयारी आहे. मात्र अशा कामाला मजूर मिळत नाही. शिवाय कोणी अर्धवट आला तर, हे काम नीट होणार नाही. यासाठी हे काम मलाच करणं भाग आहे.

कारण हे माझं काम आहे. मला हे काम कोणी सांगितलेलं नाही. यासाठी मी कुठला फंड, अनुदान घेतलेलं नाही. हे सोशल वर्क नाही. मी इतर कोणासाठी हे काम करीत नाही. हे माझं काम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT