Market Bulletin Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : आल्याला बाजारात कसा उठाव मिळतोय?

Market Bulletin : केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या घडामोडी घटत आहेत. या सर्व घडामोडींचा आपल्या शेतीमालाच्या भावावह कसा परिणाम होऊ शकतो? याची माहिती मिळणे आवश्यक आहेत. त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या घडामोडी घटत आहेत. या सर्व घडामोडींचा आपल्या शेतीमालाच्या भावावह कसा परिणाम होऊ शकतो? याची माहिती मिळणे आवश्यक आहेत. त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

सर्वात आधी आपण कापूस बाजारात आज काय स्थिती होती ते पाहू… काल कापूस भावात सुधारणा झाल्यानंतर आज देशात कापसाचे भाव स्थिरावले होते. कापसाला बाजार समित्यांमध्ये ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर वायद्यांमध्ये दुपारपर्यंत मोठी नरमाई दिसून आली. वायद्यांमध्ये सातत्याने चढ उतार दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे मोठ्या प्रमाणात कमी होऊन ८१ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील वायदे १६० रुपयांनी कमी होऊन खंडीमागे ५८ हजार १६० रुपयांवर आले होते. आंतरराष्ट्रीय बाजरात सध्या युध्दामुळे समिकरण बदललं आहे. यामुळे कापसाच्या भावात सतत चढ उतार दिसून यते आहेत. त्याचा परिणाम आपल्या देशातील बाजारावरही दिसत आहेत, असे अभ्यासकांनी सांगितले.

सोयाबीनच्या बाजारात आज क्विंटलमागं ५० रुपयांची वाढ झाली होती. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे भाव वाढलेले होते. सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात आज १३.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. काल दुपारपर्यंत असलेल्या दरापेक्षा आज दुपारपर्यंतचा भाव काहीसा अधिक होता. तर सोयापेंडचे भाव ४३१ डाॅलरवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात व्यवहाराच्या प्रत्येक सत्रात चढ उतार दिसून येत आहेत. देशातही सोयाबीनमध्ये काहिशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनला आज ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या भावात होणाऱ्या चढ उताराचा परिणाम सोयाबीनवर दिसून येत आहे. देशातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीच्या भावात काहिशी नरमाई. सणांच्या काळात मसाल्यांना मागणी वाढते. हळदीलाही मागणी आहे. पण असं असतानाही हळदीच्या भावा नरमाई दिसून येत आहे. दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा ५० ते ६० टक्क्यांनी कमी दिसते. असं असतानाही हळदीचा बाजार दबावात दिसून येत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजारांचा भाव मिळत आहे. पण हळदीचा भाव जास्त दिवस दबावात राहणार नाही. कारण यंदाही उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर स्टाॅकही कमी आहे. त्यामुळे हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याच्या भावात आज क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा काही बाजारांमध्ये दिसून आली होती. देशातील बाजारात मक्याची आवक सराससरीपेक्षा कमीच होत आहे. तर मक्याला उठाव सरासरी असल्याचेच व्यापारी सांगत आहेत. चालू खरिप हंगामात मक्याची लागवड तीन टक्क्याने अधिक झाली. पण दुष्काळी स्थितीचा फटका मका पिकालाही बसत आहे. पण इतर धान्याचे भाव स्थिर असल्याचे मक्याचे भावही जास्त प्रमाणात वाढलेले दिसत नाहीत. त्यातच खरिपातील मका बाजारात येत आहे. गरजेप्रमाणे माल मिळत असल्याने उद्योगांकडून दरात सुधारणा केली जात नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या मक्याला भाव १ हजार ८०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पशुखाद्यासाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

आल्याच्या भावातील तेजी मागील काही दिवसांपासून थांबलेली आहे. वाढलेल्या भावात आल्याची मागणी कमी झाली होती. त्यातच नफावसुलीसाठी विक्रीही झाली. त्यामुळे बाजारात पुरवठा मधल्या काळात काहिसा वाढला होता. त्याचा परिणाम आल्याच्या भावावर झाला. सध्या आल्याचे भाव प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई आणि वाढलेल्या उष्णतेमुळे आले पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे आल्याचे भाव जास्त दबावात येणार नाहीत. तसेच दरात आणखी काहिशी सुधारणा दिसू शकते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT