Mumbai News Agrowon
ॲग्रो विशेष

Mumbai News : आम्ही जगायचे तरी कसे?

इंधन दरवाढ आणि सतत होणाऱ्या गॅसच्या दरवाढीमुळे ‘आम्ही जगायचे तरी कसे’ असा सवाल दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींमधून विचारला जात आहे.

Team Agrowon

Mumbai News : सर्वसामान्य गृहिणींच्या, नागरिकांच्या दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या दरात दररोज वाढ होत आहे; तर काही दिवसांपूर्वी डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले आहेत; तर गरिबांचे इंधन म्हणून वापरले जाणारे रॉकेल दिसेनासे झाले आहे.

या इंधन दरवाढ आणि सतत होणाऱ्या गॅसच्या दरवाढीमुळे (Gas Hike Rate) ‘आम्ही जगायचे तरी कसे’ असा सवाल दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींमधून विचारला जात आहे.

महागाईत वाढ झाल्यामुळे गृहिणींना त्याचे महिन्याचे घराचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. अशात दुर्गम भागात रोजगाराचे पर्याय उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधवांना आपले घर चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

अशात नुकतेच गॅसच्या दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी ११०० रुपयांना मिळत आहे; तर इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.

गॅसदरवाढीमुळे पुन्हा चुली पेटल्या

ग्रामीण भागात नागरिकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळाले होते, पण गॅसच्या किमती वाढल्याने ८० टक्के गरीब कुटुंबे गॅस वापरत नाहीत. ही कुटुंबे पुन्हा लाकूडफाटा गोळा करून चुलीचा वापर करू लागली आहेत.

मजुरी करणाऱ्यांना रोज ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. पण गोडेतेल, मसाले, डाळी आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी केली जाते.

पूर्वी गॅस सिलिंडर तीन ते चार महिने पुरवून वापरत होते. त्यात गॅसचे भाव वाढल्याने पुन्हा जंगलातील लाकूड आणून घर चालवत आहोत. कामाला जाऊन मिळणाऱ्या मजुरीत घर चालवणे खूप कठीण झाले आहे.
रुख्मिणी गवळी, गृहिणी, सायवन
रिक्षा चालवून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, पण इंधनाचे भाव वाढल्याने आणि पूर्वीसारखे प्रवासी भाडे मिळत नाही, त्यामुळे दररोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. पूर्ण खर्च काढून दररोज तीनशे ते चारशे रुपये वाचत होते, पण आता महागाईमुळे त्याच्या निम्मेही पैसे वाचत नाहीत.
नारायण जाधव, प्रवासी रिक्षा चालक, कासा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

Moneylenders Loans Issues: शेतकऱ्यांभोवती आवळतोय सावकारी पाश

Sugar Factory Agreement: क्रांती कारखान्याच्या गळीत हंगामासाठी तोडणी-वाहतूक करार

MAVIM Tejaswini Project: सोलापुरात नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्‌घाटन

Sugarcane FRP Issue: ‘एफआरपी’ चे ६५० कोटी अडकल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT