Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana: ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत १४ हजार पुरुषांनी घेतला लाभ; सरकारकडून वसुली आणि कारवाईची तयारी

Scheme Fraud Detection: योजना केवळ महिलांसाठी असूनही, चुकीच्या माहितीच्या आधारे तब्बल १४ हजार २९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर आता सरकारने कारवाई सुरू केली.

Roshan Talape

Pune News: राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना केवळ महिलांसाठी असूनही, चुकीच्या माहितीच्या आधारे तब्बल १४ हजार २९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर आता सरकारने कारवाई सुरू केली असून, संबंधित अपात्र लाभार्थ्यांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. जर त्यांनी एका महिन्यात रक्कम परत केली नाही, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अपात्र पुरुषांनी घेतला २१ कोटी ४५ लाखांचा लाभ

या योजनेत काही पुरुषांनी खोट्या कागदपत्रांद्वारे आणि चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत एकूण २१ कोटी ४५ लाखांची रक्कम जमा झाली आहे. अशा सर्व अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, त्या नोटिशींमध्ये मिळवलेली रक्कम एका महिन्याच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. रक्कम परत न केल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारवर ५० हजार कोटींचा ताण

‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी सरकारला दरवर्षी सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला आहे. जुलै महिन्याचा हप्ता वेळेवर देण्यासाठी सरकारला सामाजिक न्याय विभागाकडून ४१० कोटींची तरतूद करावी लागली होती. त्यामुळे प्रत्येक हप्त्यासाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

आनंदाचा शिधा रद्द; काही योजना बंद होण्याच्या मार्गावर

दर महिन्याला हप्ता वितरित करताना सरकारला इतर योजनांचे निधी वळवावे लागत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम इतर योजनांवर होत आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. काही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

रक्षाबंधनपूर्वी महिलांना जुलैचा हप्ता मिळणार

दरम्यान, जुलै महिन्याचा हप्ता अजूनही प्रलंबित असून, लाभार्थी महिला या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे लाभार्थींना १३ वा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा केला जाईल, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Millets Board : राष्ट्रीय भरडधान्य मंडळ स्थापन करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारचे लोकसभेत उत्तर

Pimpalgaon APMC Controversy: अजितदादांचा आणखी एक शिलेदार अडचणीत; ६२ कोटींच्या बांधकाम निवदांवरून वाद

Organic Farming Success : प्रतिकूलतेतही नगदी पिकांचे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन

Sugarcane Nutrient Management: आडसाली उसासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

SCROLL FOR NEXT