Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : ‘कृषी’तील उल्लेखनीय कार्यासाठी शेतकऱ्यांचा गौरव

Agriculture Department : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन काढणाऱ्या, इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा बनलेल्या शेतकऱ्यांचा, कृषी अधिकाऱ्यांचा शासनाने पुरस्कार जाहीर करीत गौरव केला आहे.

Team Agrowon

Buldana News : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन काढणाऱ्या, इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा बनलेल्या शेतकऱ्यांचा, कृषी अधिकाऱ्यांचा शासनाने पुरस्कार जाहीर करीत गौरव केला आहे. हे पुरस्कार लवकरच राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत वितरीत केले जातील.

सन २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षासाठी विविध कृषी पुरस्कार शेतकरी/ संस्था/ कृषी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी गटातून निवडण्यात आले. याची घोषणा शुक्रवारी (ता.२३) झाली.

सन २०२० साठी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार शेगाव तालुक्यातील शशिकांत उर्फ अमोल भास्करराव पुंडकर (येऊलखेड) यांना जाहीर झाला. युवा शेतकरी पुरस्कार देऊळगावराजा तालुक्यातील कैलास अर्जुन नागरे (शिवनी आरमाळ), वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मेहकर तालुक्यातील गणेश लक्ष्मण लंबे (माळखेड), सन २०२१ वर्षातील कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार पांडुरंग देविदास शिंदे (मंगरूळ, तालुका चिखली),

युवा शेतकरी पुरस्कार प्रकाश भीमराव रणीत (कोकलवाडी, तालुका नांदुरा), वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार नांदुरा तालुक्यातील शिवाजी तेजराव भाकरे (कंडारी), सन २०२२ चा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मोताळा तालुक्यातील देविदास एकनाथ जाधव (भूसर)

|तसेच पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवा रत्न पुरस्कार कृषी विभागात अति उत्कृष्ट काम करणारे अधिकारी /कर्मचाऱ्यांमधून मेहकर तालुक्यातील तत्कालीन कृषी सहाय्यक तथा विद्यमान कृषी पर्यवेक्षक विठ्ठल रामेश्वर धांडे यांना जाहीर झाला आहे.

शेतीत प्रयोगशिलता जोपासणाऱ्या या शेतकऱ्यांनी आदर्शवत काम केले आहे. त्यांच्या कामाला पुरस्काराच्या माध्यमातून एक प्रकारे कौतुकाची थाप मिळाली.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT