Mathadi Agrowon
ॲग्रो विशेष

Circular of 'Panan' : ‘पणन’च्या परिपत्रकाची हमाल माथाडींकडून होळी

Mathadi Worker Issue : सांगलीतील ३०० वारणी हमालांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असे म्हणत वारणी हमाल माथाडी कामगारांनी बुधवारी (ता. १७) सांगली बाजार समितीच्या कार्यालयासमोर परिपत्रकाची होळी करत बोंबाबोंब आंदोलन केले.

Team Agrowon

Sangli News : पणन संचालकांनी १६ जानेवारीला काढलेले परिपत्रक हमाल, अडते, व्यापारी यांच्या मुळावर उठणारे आहे. या निर्णयामुळे सांगलीतील ३०० वारणी हमालांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असे म्हणत वारणी हमाल माथाडी कामगारांनी बुधवारी (ता. १७) सांगली बाजार समितीच्या कार्यालयासमोर परिपत्रकाची होळी करत बोंबाबोंब आंदोलन केले.

बाजार समितीच्या आवरात वारणी/वाराई वसूल करू नये. जे वसूल करतील त्या हमाल, अडते, व्यापारी यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांची बाजार समितीचा परवाना रद्द करावा, असे आदेशाचे परिपत्रक पणन संचालकांनी काढले आहे.

पण हे परिपत्रक एकतर्फी, मनमानी पद्धतीने काढले आहे. याबद्दल संबंधितांशी चर्चा केली नाही. यामुळे सांगलीतील ३०० तर, राज्यातील एक लाख वारणी हमालांवर बेकारीची वेळ येणार आहे. त्यामुळे शासनाने हे परिपत्रक त्वरित रद्द करावे, अशी मागणी करत सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

बाजार समिती सभापती सुजय शिंदे, सचिव महेश चव्हाण, संचालक, अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. वारणी हमालांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती कामगार नेते, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदुम यांनी दिली.

या आंदोलनापूर्वी हमाल भवन मार्केट यार्ड येथे वारणी हमाल कामगारांचा मेळावा झाला. शासनाने आठ दिवसांत परिपत्रक रद्द न केल्यास हमालीचे बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. बोंबाबोंब आंदोलनाचे नेतृत्व बाजार समितीचे हमाल तोलाईदार संचालक मारुती बंडगर, भारत गायकवाड, दिगंबर तुपलोंढे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात दबाव कायम, मका दरात मंदी, ढोवळी मिरची आवकेत चढ-उतार, शेपू दरात चढ-उतार, मोसंबी बाजारात नरमाई

Uddhav Thackeray: पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघता का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Shirala Farmers: शिराळा तालुक्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी

Power Shortage: अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे दुष्काळात तेरावा महिना

Loan Waiver List: धुळे जिल्ह्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

SCROLL FOR NEXT