Gavlau Cow  Agrown
ॲग्रो विशेष

Gavlau Cow : गवळाऊ गोवंशाचा इतिहास आणि अस्तित्वासाठी आव्हाने

History of Gavlau Cattle : गवळाऊ गोवंशाचा मूळ अधिवास विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती जिल्ह्यांत तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असून त्यातही वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्यांत सर्वाधिक घनता आहे.

Team Agrowon

प्रफुल्ल कालोकर

Indigenous Cattle Breed : गवळाऊ गोवंशाचा मूळ अधिवास विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती जिल्ह्यांत तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असून त्यातही वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्यांत सर्वाधिक घनता आहे. विदर्भाचे भूषण असलेली गवळाऊ गाय शुभ्र पांढऱ्या रंगाची सुंदर, देखणी असून विदर्भाच्या उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता तिच्या अंगात आहे.

गवळाऊची ओळख म्हणजे तिचा पांढरा रंग, जन्मतःच वासराच्या डोक्यावर असलेला लाल टिळा. ही गाय मध्यम उंचीची, हलक्या बांध्याची, रुंद व लांबट शरीराची असते. डोके शिंगाजवळ रुंद व तोंडाकडे निमुळते असते. कपाळ सपाट, डोळे पाणीदार बदामी आकाराचे असतात. कान डोक्याला काटकोनात, शिंगे आखूड व मागे वळलेली असतात. मान आखूड व खांदा एका बाजूला झुकलेला असतो.

पाय सरळ व मजबूत, पोळ खूपच लोंबती आणि स्तन मध्यम आकाराचे असतात. शेपूट आखूड व जोडपायाच्या खाली काळा गोंडा असणारे असते. शरीर काटक आणि आजाराला बळी न पडणारे असते. दिवसाला सहज ४.५ ते ६.५ लिटरपेक्षा जास्त दूध देण्याची क्षमता असलेली ही अशी कृष्णाची लाडकी गवळाऊ गाय आहे.

या गायीच्या बैलांचा उपयोग नागपूरचे भोसले राजे व गोंड राजांनी आपल्या तोफा, दारूगोळा वाहण्यासाठी केला. त्यासाठी या गोवंशाला अभय दिल्याच्या नोंदी आहेत. १९०३ च्या गॅजेटियरमध्ये ब्रिटिशांनी गवळाऊ गाईचा उल्लेख केलेला आहे. ही गाय नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) मध्ये INDIA_CATTLE_1110_GAOLAO_03006 या क्रमांकाने नोंदणीकृत आहे.

आजच्या घडीला हा गोवंश ऱ्हासाकडे चाललेला दिसून येतो. धोरणांतील बदल, लोकांचा वाढता व्यावसायिक दृष्टिकोन, चाऱ्याच्या जागांची कमतरता, जंगलबंदी, चराईबंदी, आनुवंशिकता जपण्याकरिता अपुरे प्रयत्न, देशी गोवंशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सरकारची उदासीन वृत्ती, बैलाची कमी झालेली मागणी, दुग्धजन्य पदार्थाला योग्य बाजार व बाजार भाव नसणे, शेतातील शेणखताचा वापर कमी होणे अशा अनेक कारणांमुळे हा गोवंश लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT