Hirda Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Guaranteed Rate : हमीदरापेक्षा जास्त दराने हिरडा खरेदी होणार

Hirda Market : आदिवासींच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळांची सरकारी खरेदी सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास महामंडळाने जाहीर केला.

Team Agrowon

Nagar News : राज्यातील अकोले, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील आदिवासींच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळांची सरकारी खरेदी सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास महामंडळाने जाहीर केला.

सुरू होणाऱ्या हंगामात बाळहिरड्याची खरेदी १७० रुपये प्रतिकिलोने सुरू करून हा दर टप्प्याटप्प्याने जसा बाजारात दर वाढेल तसा वाढविण्यात येईल, अशा प्रकारचे आश्वासन आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी किसान सभेला दिले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या मागणीसाठी गेले तीन वर्षे सातत्याने आंदोलने केली जात होती. नाशिक ते मुंबई लाँग मार्च व अकोले ते लोणी लाँग मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने ही मागणी प्राधान्याने करण्यात आली होती.

आदिवासी आयुक्त कार्यालय, नाशिक या ठिकाणीही याबाबत किसान सभेच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढून ही मागणी केंद्रस्थानी आणली होती. सातत्याचा पाठपुरावा व मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याबरोबर झालेल्या बैठकांचा परिणाम म्हणून अंतिमतः सुरू होणाऱ्या हिरडा हंगामामध्ये बाळ हिरड्याची सरकारी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतचे परिपत्रक आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आले आहे. प्रथमच बाळहिरड्याला किमान आधारभूत दर जाहीर झाला आहे. हिरड्याला किमान २०० रुपये प्रतिकिलो हमीभाव मिळावा, ही मागणी किसान सभा करत आली आहे. किसान सभा हिरड्याला किमान प्रतिकिलो २०० रुपये भाव मिळावा, या मागणीवर ठाम आहे.

अकोले, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील हिरडा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे, असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू घोडे, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Session 2025 : पंतप्रधानांना धमकी दिल्याचा सत्ताधाऱ्यांचा कॉंग्रेसवर आरोप; लोकसभेत गदारोळ

PM Kisan Yojana: कर्ज न फेडल्यास बँक थांबवू शकते का पीएम किसानचा हप्ता? वाचा महत्त्वाचा निर्णय

Indian Economy: आर्थिक आकडेवारीच्या खोलात शिरण्याची गरज

Agriculture Privatization: खासगीकरण हवे शेतकरी केंद्रित

Election Transparency: निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT