Chana Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Sowing : हिंगोली जिल्ह्यात रब्बीची सव्वा दोन लाख हेक्टरवर पेरणी ; हरभरा, करडई, गहू, ज्वारीच्या पेऱ्यात वाढ

Rabbi Season : कृषी व महसूल विभागाकडून संयुक्तरित्या हिंगोली जिल्ह्यातील रब्बी हंगाम २०२४-२५ मधील पेरणी क्षेत्र २० जानेवारी रोजी अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा २ लाख २५ हजार ४५७ हेक्टरवर (१२७.४६ टक्के) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली ः कृषी व महसूल विभागाकडून संयुक्तरित्या हिंगोली जिल्ह्यातील रब्बी हंगाम २०२४-२५ मधील पेरणी क्षेत्र २० जानेवारी रोजी अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा २ लाख २५ हजार ४५७ हेक्टरवर (१२७.४६ टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत यंदा १३ हजार ५ हजार हेक्टरने तर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ४८ हजार ५६३ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल, ज्वारी, गव्हाचा पेरा वाढला.

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर आहे. यंदा प्रत्यक्षात २ लाख २५ हजार ४५७ हेक्टरवर (१२७.४६) पेरणी झाली. तृणधान्यांमध्ये ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६९७ हेक्टर असतांना १७ हजार ४७९ हेक्टरवर (१४९.४३ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ४० हजार ७१८ हेक्टर (९५.८० टक्के), मक्याचे सरासरी क्षेत्र ९७१ हेक्टर असताना यंदा १ हजार ५६९ हेक्टर (१६१.५९ टक्के) पेरणी झाली.

गतवर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या पेरणीत ५७९ हेक्टरने, गव्हाच्या पेरणीत ४ हजार ६७२ हेक्टरने तर मक्याच्या पेरणीत १ हजार ९० हेक्टरने वाढ झाली. कडधान्यांमध्ये हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ असतांना प्रत्यक्षात १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टर (१३२.९८ टक्के) गतवर्षीच्या तुलनेत हरभऱ्याच्या पेरणीत ३ हजार १९  हेक्टरने वाढ झाली आहे. गळीत धान्यांमध्ये करडईचे सरासरी क्षेत्र २०५ हेक्टर असतांना प्रत्यक्षात २ हजार ७९७ हेक्टर (१३६०.०१टक्के), तिळाचे सरासरी क्षेत्र १८.६६ हेक्टर असतांना यंदा १०९ हेक्टर (५८४.१४ टक्के), सुर्यफुलाची ८०४ हेक्टर, जवसाची ६४१ हेक्टर पेरणी झाली आहे.

पिकनिहाय २०२४-२५ रब्बी अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हरभरा १२०१४७ १५९७६९ १३२.९८
ज्वारी ११६९७ १७४७९ १४९.४३
गहू ४२५०५ ४०७१८ ९५.८०
करडई २०५ २७९७ १३६०
तीळ १८.६६ १०९ ५८४.१४

तालुकानिहाय २०२४-२५ रब्बी अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हिंगोली ३१०७४ .४३६७१ १४०.३५
कळमनुरी ५०१४६ ४९७७८ ९९.२६
वसमत ४२०१९ ५२९२३ १२५.९५
औंढा नागनाथ २५७२६ ४१५२५ १६१.४१
सेनगाव २७९२६ ३७५६४ १३४.५१

हिंगोली जिल्हा वर्षेनिहाय तुलनात्मक पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
वर्षे सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

२०२२-२३ १७६८९१ १८१५९८ १०२.६६
२०२३-२४ १७६८९१ २१२४४९ १२०.१०
२०२४-२५ १७६८९१ २२५४५७ १२७.४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT