Inflation
Inflation Agrowon
ॲग्रो विशेष

महागाई रोखण्यात आरबीआयला अपयश!

Team Agrowon

मागील काही महिन्यात देशात महागाईचा (Inflation) पारा वाढत आहे. इंधनापासून सर्वच वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. महागाई रोखण्यात देशाच्या मध्यवर्ती बँकेला अर्थात रिझर्व्ह बँकेला (RBI) सपशेल अपयश आले असल्याचा आरोप आरोप ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी केला आहे.

महागाई (Inflation) रोखण्यासाठी केंद्रीय बँक अपयशी ठरली असून व्याजदर (Interest Rate) वाढवणे म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे, असे रोखठोक मत व्यक्त करताना रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मंगळवारी (दिनांक २६ एप्रिल) आरबीआयवर कठोर टीका केली आहे.

महागाई रोखण्याबाबत कठोर उपाययोजना करण्यास कमी पडलेल्या रिझर्व्ह बँकेला फटकारताना राजन यांनी रिझर्व्ह बँकेने मागील दोन वर्ष प्रमुख व्याजदर स्थिर ठेवल्याचे म्हटले आहे. कोरोना संकटाच्या प्रभावात बँकेने सावध भूमिका घेत व्याजदर 'जैसे थे'च ठेवले. मात्र दुस-या बाजुला महागाईने कहर केला आहे.

महागाईचा भडका उडाला असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व्याजदर वाढविण्याची मागणी केली जात आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नरमाईच्या भूमिकेवर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी टीका केली आहे.

राजन यांनी लिंकडीन या सोशल साईटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की, महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेला (RBI) कधी ना कधी व्याजदर वाढवावे लागतील. व्याजदर वाढवणे म्हणजे राष्ट्रद्रोह नाही तर देशातील आर्थिक स्थैर्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. महागाई विरोधातील लढाई कधीच संपुष्टात येत नाही. केंद्रीय बँकेने इतिहास पाहणे आवश्यक आहे, त्यातून कामाकाजात मदत होईल, असा सल्ला राजन यांनी दिला आहे.

दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा ९.५ टक्के राहू शकतो,असा अंदाज आरबीआयकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र त्याच्या पुढील वर्षी आर्थिक वृद्धी दरात काही प्रमाणात घसरण होण्याचे संकेत देखील मध्यवर्ती बँकेकडून देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

SCROLL FOR NEXT