High humidity room for vigorous growth of the graft  Agrowon
ॲग्रो विशेष

कलमाच्या जोमदार वाढीसाठी उच्च आर्द्रता कक्ष

या काड्यांना मुळ्या फुटण्यासाठी लावलेल्या काड्यांभोवती उच्च आर्द्रता राखणे आवश्यक असते.

Team Agrowon

विविध फळपिकांच्या अभिवृद्धीसाठी (Grafting) बी न वापरता काडीचा वापर केला जातो. या काड्यांना मुळ्या फुटण्यासाठी लावलेल्या काड्यांभोवती उच्च आर्द्रता (Humidity) राखणे आवश्यक असते. असे वातावरण कृत्रिमरीत्या निर्माण करण्यासाठी पुणे येथील आरती (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेने उच्च आर्द्रता कक्षाचे तंत्र विकसित केले आहे. हा आर्द्रता कक्ष अगदी कमी खर्चात घरच्या घरी तयार करता येतो.

काडी कलमाभोवती उच्च आर्द्रता राखणे आवश्यक

वनस्पतीच्या प्रजननासाठी बी न वापरता काडी, कंद, मुनवे, फुटवे यासारखे भाग वापरुन त्यांचे प्रजनन करण्याच्या पद्धतीला शाकीय प्रजनन म्हणतात. शाकीय प्रजनन पद्धतीमध्ये काडीकलम ही सर्वात सोपी पद्धती आहे. ज्या वनस्पतीची काडी लावायची तीची साल हिरवी असेल तर तिला तपकिरी सालीच्या वनस्पतीच्या काडीपेक्षा लवकर मुळ्या फुटतात. तसेच काडीला पाने असतील तर पानांमध्ये प्रकाशसंश्लेषणाने निर्माण होणाऱ्या अन्नाचा वापर करुन नवीन येणारी मुळे अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकतात. पानांमधून पाणी बाहेर पडत असल्यामुळे अशा काड्या लवकर वाळतात. म्हणून उघड्यावर लावलेल्या काड्यांना पाने ठेवली जात नाहीत. तसेच कोरड्या हवामानात लावलेल्या काड्या मुळे फुटण्यापूर्वीच वाळून जातात. हे टाळण्यासाठी लावलेल्या काड्यांभोवती उच्च आर्द्रता राखणे आवश्यक असते. वनस्पतीच्या मुळ्या फुटण्यासाठी लावलेल्या काड्या मुळ्या फुटण्यापूर्वीच वाळून जाऊ नये यासाठी त्या सुमारे ७० ते ९० टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात ठेवल्या तर त्या चार महिन्यापर्यंत सुद्धा टवटवीत राहू शकतात.

कसा तयार करायचा आर्द्रता कक्ष ?

- आर्द्रता कक्ष एखाद्या झाडाच्या सावलीत किंवा शेडनेटचा वापर करून मुद्दाम उत्पन्न केलेल्या सावलीतच उभा करावा.

- आपल्याला जेवढा मोठा आर्द्रता कक्ष तयार करायचा आहे तेवढी जमीन सपाट करून त्यावर त्याच आकाराचे प्लॅस्टिकचे कापड अंतरावे. या कापडाच्या कडांवर सर्व बाजूंनी आडव्या विटांचे दोन थर द्यावेत.

- विटांनी वेढलेल्या या वाफ्यात चार मी.मी. च्या चाळणीने चाळलेली बारीक वाळू भरावी. या वाफ्यावर तारेच्या कमानी उभ्या करून त्यावर प्लॅस्टिकचे रंगहीन पारदर्शक कापड टाकले की झाला आर्द्रता कक्ष तयार.

- प्लॅस्टिकचे कापड जिथे जमिनीला टेकते तिथे त्यावर वजनासाठी विटा ठेवाव्यात.

- तारेच्या कमानीवर प्लॅस्टिकचे कापड अंथरण्यापूर्वी वाफ्यातून पाणी बाहेर वाहू लागेल इतके पाणी द्यावे. मग वाफ्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे.

- सुमारे १५ ते २० मिनिटातच या प्लॅस्टिक अच्छादनावर आतल्या बाजूने बाष्प जमू लागते. ते पाण्याच्या सूक्ष्म बिंदूंच्या रूपाने दिसते.

- आर्द्रता कक्षातील वातावरणात उच्च आर्द्रता निर्माण झाली असल्याची ही खून आहे. यामध्ये लावलेल्या काड्या तीन-चार महिन्यापर्यंत टवटवीत राहतात.

- बाह्य हवामानानुसार दर दोन ते चार दिवसांनी प्लॅस्टिकचे आच्छादन बाजूला करून वाफ्यातून बाहेर पडेल इतके पाणी या वाफ्यांना द्यावे आणि वाफे परत झाकून ठेवावे.

- घराच्या बाल्कनीत अगर खिडकीत ठेवता येईल असा लहानसा उच्च आर्द्रता कक्ष हवा असेल तर योग्य आकाराच्या एखाद्या कुंडीत बारीक वाळू भरावी.

- कुंडीतल्या वाळूत इंग्रजी यु आकाराच्या तारेच्या दोन कमानी उलट्या खोचाव्या आणि त्यावर एक पारदर्शक प्लास्टिकची पिशवी घालावी.

- पिशवीची मोकळी कड कुंडीला बांधावी वरील दोन्ही आर्द्रता कक्षावरील तारेच्या कमानी उभारताना वाफ्यात लावलेल्या गाड्या प्लॅस्टिकच्या अच्छादनाला टेकणार नाहीत इतक्या उंच असाव्यात.

- या आर्द्रता कक्षावर कधीही ऊन पडू देऊ नये. कारण त्यावर ऊन पडल्यास तो इतका तापतो की त्यात लावलेल्या काड्या मरून जातात.

स्त्रोत ः पुस्तिका- अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) ने विकसित केलेली तंत्रे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली

Hivare Bazar Village: हिवरे बाजारला ‘जल समृद्ध गाव’ पुरस्कार

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

SCROLL FOR NEXT