Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: कृषी विभागाची साहित्य खरेदी नियमानुसारच

Bombay High Court Verdict: तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीपूरक साहित्य (निविष्ठा) खरेदीसाठी राबविलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीपूरक साहित्य (निविष्ठा) खरेदीसाठी राबविलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या.

न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी निविष्ठा खरेदीप्रकरणात अनियमितता आणि डीबीडी धोरण वगळून प्रक्रिया राबविल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तुषार पाडगीलवार यांनी याचिका दाखल केल्या होत्या. मात्र मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

१२ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, बॅटरीवर चालणारे स्प्रेयर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डिहाइड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन यांच्या मार्फत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले होते.

या निर्णयाला विरोध करत ॲग्री स्पेअर टीआयएम असोसिएशन आणि उमेश भोळे यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी स्वतंत्र याचिका व जनहित याचिका दाखल करून या वस्तूंना थेट लाभ हस्तांतर योजनेतून वगळण्यास विरोध दर्शवला होता.

याप्रकरणी न्यायालयाने, डीबीटी योजना व विशेष कृती आराखडा यांचा एकमेकांशी संबंध नाही. शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले असून त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असे याचिकाकर्त्याला सुनावले. शासनातर्फे ॲड. अंतुरकर, ॲड. व्यंकटेश दौंड, ॲड. कुंभकोनी यांनी बाजू मांडली.

या याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले, की याचिकाकर्ते केवळ आपल्या व्यवसायाच्या हितासाठी न्यायालयात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा वापर करून अनेकांनी शासनाच्या तत्कालीन धोरणावर चुकीचे भाष्य करून बदनामी केली आहे. तसेच याचिकाकर्ते तुषार पाडगीलवार यांनी न्यायालयीन प्रक्रियांचा गैरवापर करत केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड ४ आठवड्यांत हायकोर्ट विधी सेवा प्राधिकरणाकडे भरण्याचे आदेश दिले आहेत. पाडगीलवार यांनी नागपूर न्यायालयात जनहित याचिकेच्या नावाखाली काही शेतकऱ्यांना पुढे करत खोटी बिले व खोटे पुरावे दाखवल्याचेही न्यायालयाने निदर्शनास आणले.

शेतकरी हितास प्राधान्य देणारा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याच्या विरोधात अनेकांनी माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली. मात्र आज न्याय देवतेने सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला.
धनंजय मुंडे, माजी कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Flood : शेतकऱ्यांनो, खचू नका; सरकार तुमच्या पाठीशी

Nanded Flood : संसार उघड्यावर, जगायचे कसे?

Rain Damage Compensation : खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा

Sugarcane Rate : मांजरा साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी दर

Landslide : पावसाचा जोर वाढला; करूळ घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT